mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 20, 2026
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

जेलमधील ओळखीचा फायदा घेऊन मदतीच्या बहाण्याने बोलावून घ्यायचे आणि निर्जनस्थळी नेऊन लुटायचे, अशा एका भयंकर टोळीचा सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्यात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​नेमकी घटना काय?

​यातील फिर्यादी ग्लेन पर्सी सिक्वेरा (रा. कल्याण, ठाणे) हे २०२४ मध्ये एका सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा कारागृहात असताना त्यांची ओळख सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळया सुरेश पवार (रा. नंदूर, ता. मंगळवेढा) याच्याशी झाली होती.

जामिनावर सुटल्यानंतर काळया पवारने फिर्यादीला “माझी मोठ्या लोकांशी ओळख आहे, तुझी केस मिटवून टाकतो” असे आमिष दाखवले.

​विश्वास ठेवून फिर्यादी आपल्या मैत्रिणीसह ९ एप्रिल रोजी मंगळवेढ्यातील ब्रम्हपूरी शिवारात आले. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या काळया पवार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला गाठले. शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्याकडील २.५० लाखांची रोकड, सोन्याची चैन आणि चांदीची चैन असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटून नेला.

​पोलीसांची ‘फिल्डिंग‘ आणि कारवाईचा थरार

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचे पथक माचणूर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काळया पवारची पत्नी सुप्रिया ही या गुन्ह्यात सामील असून ती नंदूर येथील घरी आली आहे.

​पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सुप्रिया अजित उर्फ काळया पवार (वय ३५) हिला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला पती अजित, साथीदार रणवीर (रा. मिरज) आणि स्वतः मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

​हस्तगत केलेला मुद्देमाल:

​रोख रक्कम: १,७५,००० रुपये
​सोन्याची चैन: ५०,००० रुपये
​चांदीची चैन: ५,००० रुपये
​एकूण जप्ती: २,३०,००० रुपये

​यांनी गाजवली कामगिरी:

​पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संजय जगताप, सपोनि ज्ञानदेव वाघ, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल आणि मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पीएसआय बनकर व श्रीकांत देवकते यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हनी ट्रॅप

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
Next Post
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा