टीम मंगळवेढा टाईम्स।
वीस दिवस उलटले तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठेच्या सरपंच जैतूनबी शेख यांचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
शोध लागत नसल्याने नातेवाइकांकडून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे. नातेवाइक , पोलिसांनी शोध, घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी, अशी मागणी कुटुंबीय करणार आहेत.
पालकमंत्र्यांकडे मागणी करणार
आई बेपत्ता होऊन वीस दिवस लोटले आहेत. मात्र अद्याप कुठलाच ठावठिकाणा लागला नाही. सखोल चौकशीसाठी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी अशी मागणी आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे करणार आहोत. सरदार शेख, मुलगा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज