मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सायबर गुन्हेगारांची वक्रदृषी आता शेतकऱ्यांवर पडली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
पीएम किसान योजनेच्या एपीके फाईलच्या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, खातरजमेशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन केलं जातंय.
सायबर गुन्हेगारांची वक्रदृषी आता शेतकऱ्यांवर पडली आहे.. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पीएम किसान योजनेची एपीके फाईलच्या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, खातरजमेशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन केलं जातंय. शेतकरीच नाही तर राज्याच्या कृषिमंत्र्यांना देखील सायबर गुन्हेगारांच्या या फेक लिंकचा फटका बसला आहे,
नाशिकच्या त्र्यंबक रोड दुडगावचे रहिवासी असलेले रामभाऊ चव्हाण यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेत. एका व्हॉट्सअॅप मेसेज लिंकवर क्लिक करणं त्यांना चांगलचं महाग पडलंय. दोन दिवसापूर्वी चव्हाण यांच्या मोबाईल व्हाटस्अॅप ग्रुपवर पीएम किसान योजनेची लिंक आली.
शेतकऱ्यांच्या योजनेशी संबंधित असल्याने ती लिंक त्यांनी ओपन केली. पण लिंक ओपन करतातच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या बँक अकाउंटमधून 2 लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.
हा मेसेज बघितल्यानंतर ते गोंधळले या गोंधळातून ते बाहेर पडत नाही तोच त्यांना त्यांच्या मित्रांचे दुसऱ्या नंबर वर फोन सुरू झाले. त्यांच्या मोबाईलमधून पीएम किसान योजनेची ती लिंक फॉरवर्ड होत असल्याचं त्यांना मित्रांनी सांगितलं.
हे सगळ घडल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आल की आपला मोबाईल हॅक झाला असून आपली फसवणूक झालीय आणि त्या नंतर त्यांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पण अशा प्रकारे केवळ रामभाऊ चव्हाण यांची फसवणूक झालीय असं नाही.
शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांचा गंडा
नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी असा प्रकारे गंडा घातला आहे. यात कुणाचे 2 लाख,कुणाचे 1 लाख 10 हजार तर कुणाचे 40 हजार रुपये त्यांच्या अकाउंटमधून गायब झाले आहे. असंख्य शेतकरी आहे की ज्यांच्या अकाउंटमधून 1 हजार, 2 हजार, 5 हजार रुपये गायब झाले आहे.
फ्रॉड नेमका कसा होतो?
शेतकरीच नाही तर नाशिक मधील एका बांधकाम व्यवसायिकानेदेखील ही लिंक ओपन केल्याने त्याच्या अकाउंट मधून तब्बल 15 लाख रुपये गायब झाल्याची तक्रार नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे… हा फ्रॉड नेमका कसा होतो आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी नाशिकच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलीय.
सायबर गुन्हेगारांचा नवा स्कॅम
राज्याचे कृषिमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना देखील सायबर गुन्हेगारांचा स्कॅमचा फटका बसता बसता वाचला. कोकाटे यांना देखील अशाच प्रकारे एक लिंक मिळाली त्यांनी ती ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला मात्र त्यांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांच्या अकाउंटवरील पैसे मात्र सायबर गुन्हेगारांना काढता आले नाही.एकूणच सायबर चोरांच्या निशाण्यावर सर्वसामान्य शेतकरी आला असून शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जातंय..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज