mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 3, 2020
in सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या संशयितांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

त्यासाठी संबंधित तालुक्‍यातील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोय करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

कर्नाटकसह अन्य राज्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी रेल्वे स्थानक, एसटी स्थानकांवर केली जाणार आहे. तर जिल्ह्याच्या सीमेजवळील नागरी आरोग्य केंद्रांवरही संशयितांची तपासणी केली जाईल, असेही स्वामी यांनी सांगितले.

त्यानुसार महापालिकेने नियोजन केले असून ग्रामीण भागात परजिल्ह्यातून तथा परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर वॉच ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्‍ती केली आहे. तर त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

टेंभूर्णी, करमाळा, माळशिरस (नातेपुते), सांगोला, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर अशा ठिकाणीही तपासणीची सोय केली आहे.

परजिल्ह्यातून तथा परराज्यातून कोरोना बाधित रुग्ण आपल्याकडे येऊ नयेत, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, पुढील संसर्ग थांबावा या हेतूने हे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासह स्थानिक पोलिसांचाही मदत घेतली जाणार आहे.

नगरपालिका क्षेत्रातच वाढतोय कोरोना

पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा या पाच तालुक्‍यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या आतापर्यंत सर्वाधिक राहिली आहे.

परजिल्ह्यातून तथा कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्यांची संख्या शहरांमध्ये लक्षणीय आहे. नगरपालिका तथा नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता नगरपालिकांनाही स्वतंत्र आराखडा तयार करावा लागेल. परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या नोंदी नियमित ठेवून त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल.

संशयितांना क्‍वारंटाईन तर बाधितांवर वेळेत उपचार करणे सोयीचे होईल. त्यामुळे ठराविक ठिकाणी वाढणारा संसर्ग आटोक्‍यात येईल, असा विश्‍वास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्‍त केला.(सकाळ)

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यादृष्टीने नियोजन सुरु आहे. गावोगावी ‘माझे गाव कोरोनामुक्‍त गाव’ हे अभियान राबविले जात आहे.

आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये दुसऱ्या लाटेत दहा टक्‍क्‍यांची वाढ होईल, असे सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोना संशयितांची टेस्टही वाढविली जात आहे.– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनाकोरोना टेस्टसोलापूर

संबंधित बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
Next Post
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची! पुढील भरपाई? जाणून घ्या

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा