mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सहकारी संस्थांना वसुली दाखला मिळण्याची प्रक्रिया वेगवान होणार; पतसंस्था व बँकांची कर्जे वसुली गतिमान होण्यासाठी मदत होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2024
in राज्य
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातल्या पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी आवश्यक असणारा १०१ वसुली दाखला मिळण्याची प्रक्रिया वेगवान होण्यासाठी शैलेश कोतमिरे , सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य ,

पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था आणि १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला देताना अवलंबवयांच्या कार्यपद्धतीबाबत सुधारित सूचना बाबतचे परिपत्रक दिनांक १४ मे २०२४ रोजी निर्गमित केले आहे.

सहकारी पतसंस्था व बँकांची कर्जे वसुली होण्यासाठी सदरचे परिपत्रक महत्वाचे असुन १०१ अनवयेची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

कर्ज वसुलीसाठी १०१ अनवये दाखला द्यावयाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनांना खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

१. दाखल १०१ प्रकरणांमध्ये त्रुटी नसतील तर असे प्रकरण दाखल झाल्यापासून तीन दिवसांच्या आत सुनावणी नोटीस निर्गमित होईल याची दक्षता घ्यावी.

२. संस्थेच्या १०१ प्रस्तावामध्ये त्रुटी असतील तर प्रकरण दाखल झाल्यापासून दहा दिवसाच्या आत त्रुटींची पूर्तता करून सुनावणी नोटीस निर्गमित होईल याची दक्षता घ्यावी.

३. प्रथम सुनावणीच्या दिनांक पासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वसुली दाखला निर्गमित करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.

४. तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास त्याबाबतची लेखी कारणे आदेशामध्ये नमूद करण्यात यावीत.

५. जिल्हा उपनिबंधक यांनी दरमहा त्यांच्या आधिनिस्त सर्व निबंधकांचा वसुली दाखला प्रकरणाबाबत आढावा घेण्यात यावा.

६. कोणत्याही सबळ कारणाशिवाय सुनावणीच्या प्रथम दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत वसुली दाखला निर्गमित करण्यात कसूर केली असेल तर अशा निबंधका विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.

७. विभागीय सहनिबंधक यांनी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता प्रलंबित असलेल्या वसुली दाखला प्रकरणांचा दरमहा आढावा बैठकीमध्ये स्वतंत्र आढावा घेण्यात यावा आणि त्याची नोंद अधिकारी निहाय इतिवृत्तामध्ये घेण्यात यावी.

८. कार्यालय तपासणी करतेवेळी संबंधितांनी याबाबतची सद्यस्थिती त्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद करावे.

९. जिल्ह्यातील नागरी/ ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या कलम १०१ /कलम १५६ /कलम १००-८५/ अपसेट प्राईज निश्चिती /वसुली विषयक अडचणी याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी त्या त्या जिल्ह्याच्या नागरी /ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रतिनिधी समवेत तीन महिन्यातून एकदा एकत्र सभा आयोजित करून पतसंस्था पुढील अडचणी सोडवाव्यात.

या प्रमाणे संबंधित आस्थापनांना मा. श्री शैलेश कोतमिरे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला देताना अवलंबवयांच्या कार्यपध्दतीबाबत सुधारित सूचना परिपत्रक काढून निर्गमित केल्या आहेत. या मुळे निश्चितच वसुलीसाठी प्रक्रिया गतिमान होण्यासाठी चालणा मिळणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सहकारी बँक

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

अभिनंदन! इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेजचे बोर्ड परीक्षेत घवघवीत यश; 'या' मुलींनी मारली बाजी

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा