mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दातृत्व! स्वतःच्या कारखान्यावर ऋण काढून साजरा केला ‘विठ्ठल’चा सण; अभिजित पाटलांनी सभासदांना दिलेला शब्द पाळला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2022
in सोलापूर
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ऋण काढून सण साजरा करणे ही एक ग्रामीण भागातील म्हण आहे . अर्थात ही म्हण स्वतःचे चैन भागवणान्यांसाठी वापरली जाते. मात्र या म्हणीचा अर्थ बदलून टाकणारी कृती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे.

त्यांनी स्वतःच्या दोन खासगी कारखान्यांवर कर्ज काढले असून त्या कर्जाच्या रक्कमेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात केली आहे 7 सप्टेंबरपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .

श्री वठ्ठिल सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित आणि निवडणूक प्रचारात प्रचंड गाजलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ३० कोटींच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात यश मिळविले.

‘डीव्हीपी’ उद्योग समुहातील दोन खासगी साखर कारखान्यांवर कर्ज काढून आणि अन्य मार्गाने ही रक्कम उभी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०२०-२१ सालच्या हंगामात कारखान्याने ३ लाख ३ हजार मे.टन उसाचे गाळप केले होते. यामधील ३ हजार ३३४ शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे सुमारे ३० कोटी रुपये थकविले होते.

यातील ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची संपूर्ण प्रतिटन २१०७ रुपये इतकी रक्कम, तर उर्वरित शेतकऱ्यांचे प्रतिटन १०७ ते १ हजार रुपये या प्रमाणात ऊस बील थकीत होते.

निवडणूकी दरम्यान अभिजीत पाटील यांनी आगामी गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी मागील थकबाकीची रक्कम देण्याचा शब्द दिला होता. दि.२१ जुलै रोजी पाटील यांनी चेअरमन पदाची धुरा हाती घेतली.

त्यानंतर केवळ दीड महन्यिात थकीत ऊस बिलांचा प्रश्न मार्गी लावत दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. तसेच कारखानाही सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

‘ती’ साखर खराब

कारखान्याच्या गोदामात असलेली राज्य बँकेच्या ताब्यातील साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा विषय सतत पुढे येत होता. उच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला होता. यावरही नंतर तोडगा निघाला.

मात्र, ती साखरच अतिशय खराब झालेली असल्याने विकली जात नाही. त्यामुळे ‘धाराशिव’ आणि ‘नांदेड’ येथील साखर कारखाना युनिटवर २२ कोटी ५० लाखाचे कर्ज घेतले.

अन्य मार्गाने उर्वरित रक्कम उभा करून येथील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्याचा नर्णिय घेतल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

दोन्ही मिल चालवणार

यंदाच्या हंगामासाठी कारखान्याची नवीन आणि जुनी मील सुद्धा चालवली जाणार आहे. त्यासाठी तन्हिी बॉयलर, टर्बाईनची कामे पूर्ण केली असून दररोज किमान १० हजार मे.टन ऊस होणार आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी-वाहतुकीसाठी ४५० ट्रॅक्टर, ३५० मिनी ट्रॅक्टर, २२५ बैलगाड्यांचे करार पूर्ण केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
Next Post

भैरवनाथ शुगरचे यंदा ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट; बॉयलर पूजन संपन्न

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा