टीम मंगळवेढा टाईम्स।
स्वस्तात सोने देतो म्हणून बोलावून घेत मारहाण करीत साडेचार लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याचा प्रकार बोराळे (ता. मंगळवेढा) रस्त्यावर घडला आहे.
याबाबत शेटिबा गौतम जाधव (वय ३२, रा. किलारी, ता. औसा, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यामध्ये चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास सुरेश ऊर्फ बिगुल्या काळे याने जाधव यांना कमी पैशामध्ये सोने देतो, असे सांगितले.
यावेळी जाधव यांनी भावजी अरुण गायकवाड यांना बोलावून ते दोघे मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या रोडवर आतमध्ये अर्धा किमी अंतरावर कॅनॉल पट्टी येथे गेले.
या ठिकाणी गेल्यानंतर काळे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी मिळून जाधव यांना मारहाण केली. खिशातून ४ लाख ४८ हजार रोख रक्कम, तसेच अरुण गायकवाड यांचा सात हजार किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल बळजबरीने काढून घेतला.
यानंतर ही गोष्ट कोणाला सांगितली, तर तुम्हास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन चौघे जण हे दोन मोटारसायकलवरून निघून गेले.
यानंतर शेटिबा जाधव यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सपोनि अंकुश वाघमोडे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज