टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील दिव्यांगासाठी प्रहार संघटनेला केलेल्या मागणीला सकारात्मकता दाखवत नगरपालिकेने दिव्यांग भवन बांधण्यासाठी खोमनाळ नाका येथे सि.स.क्र.2870 ही जागा उपलब्ध करून दिल्याने दिव्यांग बांधवातून आनंद व्यक्त होत आहे.
2013 पासून शहरात दिव्यांग भवन उभे करा अशी मागणी प्रहार संघटनेने वारंवार करत निवेदने देत नगरपालिकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले.
पण अधिकारी किंवा शहरातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने शेवटी प्रहार संघटनेचे दिव्यांग भवनाचा पाठपुरावा सोडला नाही त्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी ,पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देत पाठपुरावा सुरू ठेवला.
दरम्यान लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्यामुळे नगरपालिकेत प्रशासक आले.जोपर्यंत दिव्यांगासाठी जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत प्रहार ने दिव्यांग दिन साजरा करत नाही असे इशाराही तीन डिसेंबर पूर्वी दिला होता.
यावेळी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, विनायकराव साळुंखे , इनुस मोगल ,खताळ यांच्या सतत संपर्कात राहून अखेर दिव्यांग भवनासाठी जागा खोमनाळ नाका येथे निश्चित करून 6 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र.9 ठराव 79 नुसार मंजूरी घेत.
या ठरावाची प्रत आज प्रहार संघटनेच्या सदस्यांना देत दिव्यांग दिनाची भेट देत असल्याचे नगरपालिकेचे अधिकारी साळुंखे यांनी सांगितलं दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा नगरपालिकेमध्ये घेतली.
यावेळी नगरपालिकेने दिव्यांग दिन ही साजरा केला सर्व दिव्यांगाना गुलाब पुष्प दिले यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा मूकबधिर प्रशालेतील मुख्याध्यापक रामचंद्र हेंबाडे, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रहारचे शहराध्यक्ष आनंद गुंगे ,संपर्कप्रमुख शकील खाटीक, सविता सुरवसे, नागेश मुद्गुल, सुधिर हजारे, अश्विनी बिनवडे, युवराज टेकाळे ,नवनाथ मासाळ, वैशाली कोष्टी ,शबाना मकानदार व इतर प्रहार सैनिक हजर होते.
प्रहार संघटने कडून नगरपालिकेचा पाठपुरावा दिव्यांग भवनासाठी केला तो ठराव हातात मिळाल्यामुळे ही माझ्या आजपर्यंतच्या कामाची पोहच मिळाल्याने प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगीतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज