टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात लोकप्रिय असलेल्या साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या १३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा बेगमपूर येथील मंगळवेढा – सोलापूर रोडवरील विश्वजीत मंगल कार्यालय येथील साजिरी लॉन्समध्ये
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना आमदार समाधान आवताडे व पुणे येथील दैनिक राष्ट्रसंचारचे संपादक अनिरूद्ध बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक रणयुग टाईम्सचे मानद संपादक दिलीप बिनवडे यांनी दिली.
सा.रणयुग टाईम्सच्या तेराव्या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने समाज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २५ मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येईल.
याप्रसंगी ॲड.बिराप्पा जाधव (जीवनगौरव),
श्रीमती उषाबाई डोके (आदर्श मातारत्न),
शिवराम गिड्डे (सुवर्णरत्न)भिमराव मोरे (समाजरत्न),
विनायक यादव (सरपंचरत्न) सौ.सविता माळी(क्रांती-जोतीरत्न)डाॅ.अमोल चव्हाण(आरोग्यरत्न) आनंद थिटे(कर्तव्यरत्न) सतिश पवार (शिक्षकरत्न)विकास वाघमारे(युवा राजरत्न)सौ जयश्री कवचाळे(कर्तुत्वान नारीरत्न) बिभीषण बेदरे (कृषीरत्न)
लक्ष्मण हेंबाडे(संघटनरत्न) गणेश म्हेत्रे (उद्योजकरत्न)रमेश डोके(ज्ञानरत्न) प्रशांत गायकवाड (युवा कार्यरत्न) संतोष दुधाळ (आदर्श योगरत्न)सौ उषा कोष्टी (शिक्षण सेवारत्न)सचिन जाधव (कृषी सेवारत्न)
समाधान फुगारे (दर्पणरत्न)महिबुब तांबोळी (युवा व्यवसायरत्न)हर्षद साबळे(प्रेरणादायी युवकरत्न)अक्षय सुरवसे(युवा उद्योजकरत्न) व्ही.आर.नवचैतन्य अर्बन निधी लि.मंगळवेढा(संस्थारत्न) तसेच जयहिंद करीअर अकॅडमी,माचणूर(प्रशिक्षण संस्थारत्न)असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह,मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून या साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या आज तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साप्ताहिक रणयुग टाईम्सचे संस्थापक संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज