mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवणार १०० दिवसांचा कार्यक्रम, कर्ज मर्यादा होणार पंधराहून ‘एवढ्या’ लाखापर्यंत, पंढरपूरमधून होणार सुरुवात; सर्वसामान्य योजना पोहोचवणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 15, 2025
in राज्य, सोलापूर
मोठी बातमी! मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा; पंढरपुरात उपकेंद्राचे होणार उदघाटन; उद्योजकांची संख्या वाढावी, उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत या दृष्टिने केले आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाचा कृती आराखडा आखून पेंडिंग कामे पूर्ण केली आहेत. तद्नंतर आता शासनाने १५० दिवसाचा आराखडा राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याच धर्तीवर कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करण्याकरिता १०० दिवसाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

या विकास आराखड्याची सुरुवात पंढरपूरमधून आज करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्यभरामध्ये एक लाख ३७ हजार तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. याकरिता ११७८२ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून या कर्जाच्या व्याजापोटी १०९० रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे. आजपर्यंत १३४५० मराठा उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

ही आकडेवारी आणखीन वाढावी, मराठा समाजातील युवक उद्योगाकडे वळावा याकरिता आपण शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून राज्यभर याचा प्रचार आणि प्रसार करणार असून प्रकरण करण्याबाबत बँकांच्या अडचणीही समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत अनंत जाधव, योगेश वाघ व मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

केवायसीकरिता आकारले जातात दहा दहा हजार रुपये

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एखाद्या तरुण उद्योजकाला जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याविषयी लागणारी कागदपत्रे तयार करण्याकरता एजंटाची मोठी फौज निर्माण होत आहे.

तर महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येणाऱ्या केवायसीकरिता दहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार महा-ई-सेवा केंद्राचे चालक करत आहेत, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

जिल्ह्यात दक्षिण उत्तर, अक्कलकोटची टक्केवारी कमी

सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्ज घेण्यामध्ये उत्तर तालुका एकदम मागे आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत फक्त १९४ लाभार्थी आहेत. तर अक्कलकोटमध्ये १२१ लाभार्थी आहेत. तरी या तीन तालुक्यातील लाभार्थ्यांनी महामंडळाबाबतची माहिती घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा

सोलापूर जिल्ह्यात लोकमंगल बँक, शरद नागरी सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा फायनान्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे चित्र चांगले आहे.

नागपूर महोत्सवात मागणी केली आहे

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकरिता एका लाभार्थ्याला पंधरा लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याची परवानगी आहे. पूर्वी दहा लाख होते, नंतर पंधरा लाख केले. आता नागपूर अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर आम्ही २५ लाखांची मागणी केली आहे, काही दिवसात ही मागणी मान्य केली जाईल.

बँकांनी ज्यादा व्याजदर आकारू नये

मराठा तरुणांना कर्ज पुरवठा करत असताना बँका ज्यादा कर्ज व्याज आकारतात. अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. महामंडळ १२ टक्केने व्याज परतावा लाभार्थ्यांना देते, तेवढेच १२ टक्के व्याज बँकांनी घ्यावे. १४, १६, १८ टक्केपर्यंत व्याजदर लावू नये, असेही पाटील म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 10, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
Next Post
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

वाळू डेपोमधून मोफत वाळू घेण्यासाठी 'या' अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रॉयल्टी पावती घरपोच मिळणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा