टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी)
सायकल कोठे ठेवली आहे आणि ती दुरुस्त करायची आहे, असे विचारल्याच्या किरकोळ कारणावरून मेव्हण्याने आपल्याच भाऊजीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे घडली आहे.
या हल्ल्यात भाऊजी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी मेव्हण्यासह दोघांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष पुजारी आणि शिवानंद आनंदपुरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकी घटना काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोणज येथील रहिवासी असलेले फिर्यादी प्रकाश पुजारी (वय ३१) हे २७ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास आपले मेव्हणे संतोष पुजारी यांच्याकडे गेले होते.

माझी मुलगी लक्ष्मी हिची सायकल कोठे आहे? ती दुरुस्त करून द्यायची आहे,” असे प्रकाश यांनी मेव्हण्याला विचारले.

या साध्या प्रश्नाचा राग अनावर झाल्याने आरोपी संतोष पुजारी हा थेट फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. “आमचा काहीही संबंध नाही, तू मला विचारणारा कोण?” असे म्हणत त्याने अद्वातद्वा शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर रागाच्या भरात संतोषने जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलून प्रकाश यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात प्रकाश पुजारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

गावकऱ्यांनी केली सोडवासोडवी
हा थरार सुरू असतानाच गावातील भीमाशंकर पुजारी हे त्या ठिकाणी धावून आले. त्यांनी मध्यस्थी करत पुढील अनर्थ टाळला आणि भांडण सोडवासोडवी केली. जखमी प्रकाश पुजारी यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या रक्ताळलेल्या मारामारीचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













