mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 12, 2024
in राज्य
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

टीम मंगळवेढा टाइम्स ।

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विधानसभेतील सक्रिय 274 आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते.

यामध्ये महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम राहिली आहे.

फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम
10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मॅजिक पॅटर्न दाखवला होता. 2022 च्या निवडणुकींचे मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं.

यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपुर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती. 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न फडणवीसांनी पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक मारली आहे.

विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडलेली दिसतेय. सलग 5 टर्म आमदार असणाऱ्या शरद पवार पुरस्कृत उमेदवाराला फडणवीसांकडून धोबीपछाड देण्यात आला.

कसा ठरतो मतदानाचा कोटा?

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं मतदानाचा कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे.

विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

पक्षीय बलाबल कसं होतं?

महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत.

त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज होती.

महाविकास आघाडीकचं काय?

काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मतं निर्णायक होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा होता.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांना मतांची गरज होती.

कोणकोणते उमेदवार विजयी?

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

1) भावना गवळी –
2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव – 26

शिवसेना ठाकरे गट (विजयी घोषित होणं बाकी)

1) मिलिंद नार्वेकर – 22 मतं

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार (निकाल येणं बाकी)

1) जयंत पाटील (शेकाप) – 12 मतं

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय; फक्त शिक्षणच नव्हे, तर ‘इतर’ शुल्कही १०० टक्के माफ; कशाकशात मिळणार ही सूट…

May 21, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

कामाची बातमी! लाडक्या बहिणींनो ही चूक अजिबात करू नका; अन्यथा अफवेला पडाल बळी

May 21, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

May 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ…

May 18, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

May 18, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण

May 17, 2026
Next Post
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! प्रत्येक तालुक्यात 'हे' भवन उभारणार, शिंदे सरकारची घोषणा; दोन वर्षांत सरकारची सरस कामगिरी

ताज्या बातम्या

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय; फक्त शिक्षणच नव्हे, तर ‘इतर’ शुल्कही १०० टक्के माफ; कशाकशात मिळणार ही सूट…

May 21, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

May 21, 2026
मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

May 21, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

May 21, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! सद्‌गुरुंच्या बैठकीहून पत्नीला आणण्यासाठी निघाले; पण वाटेतच कारने घेतला जीव; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा