mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंत्री नवाब मलिक यांना आठ दिवसांची कोठडी, पैसे दाऊदला पोहोचल्याचा ईडीचा दावा; न्यायालयात नेमकं काय झालं, वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 23, 2022
in क्राईम, राज्य
Breaking! राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात; पहाटेपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांना आज ईडीने अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली.

ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी ‘नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे’ अशी प्रतिक्रिया दिली. अटक झाल्यानंतर नबाव मलिक यांना मेडिकलसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथून त्यांना ईडीच्या स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले. इथे त्यांच्या कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद झाले.

खुद्द मलिक यांनी मला कोणतेही समन्स नव्हत, मला जबरदस्तीने येथे आणलयं, असा दावा न्यायालयात केला. मलिक यांनी गॅंगस्टर दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले.

पारकरने ते इब्राहीमला दिले, असा दावा करत हे ‘टेरर फंडिंग’ असल्याचा युक्तिवाद केला. हा व्यवहार 1996 मध्ये झाला होता.

न्यायालयात नेमकं काय झालं?

कुर्ला परिसरातील गोवावाला कंपांऊड येथील जागा मलिक यांनी गॅंगस्टर दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित व्यक्तींकडून घेतल्याचा दावा ईडीचे वकील अनिलसिंह यांनी केला.

दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे अनिलसिंह यांनी सांगितले. तिचा भाऊ इक्बाल याला ईडीने दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. मुनिरा आणि मुरियम यांची ही वडिलोपार्जित मालमत्ता होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांचीच यावर मालकी होती.

हसीन पारकरशी संबंधित सलीम पटेल याला या मालमत्तेमधील भाडेकरू काढण्याचे अधिकार देण्यात आलेले होते. मालमत्ता विकण्याची पाॅवर ऑफ अॅटर्नी त्याच्याकडे नव्हती. या व्यवहारात १९९३ च्या बाॅम्बस्फोटातील दोषी सरदारखान हा सुद्धा सहभागी होता.

ही मालमत्ता मलिक यांच्या एका कंपनीला सलीम पटेल मार्फत विकण्यात आली. मूळ मालक असलेल्या मुनिरा यांना एक रुपयाही मिळाला नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण व्यवहार 55 लाख रुपयांचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

५५ लाख रुपये मिळाल्यानंतर हसीन पारकरने ही मालमत्ता मलिकांकडे हस्तांतरीत केली. या मालमत्तेची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये होती. पण ती ५५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. ही मालमत्ता आता त्यांना विकसित करायची आहे.

ही मालमत्ता मलिकांना कागदोपत्री विकणारा सलीम पटेल हा हसीना पारकरचा हस्तक होता. हसीना पारकरकडून पैसे दाऊद इब्राहीमला गेले. या साऱ्या बाबींचा आणखी तपास करायचा असल्याने मलिक यांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने केली.

बचावाच्या युक्तिवादात काय झाले?

मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी कोठडीस तीव्र विरोध केला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाॅंडरिंग (PMLA) हा कठोर कायदा आहे. हा कायदा येण्यापूर्वी सहा वर्षे आधी म्हणजे 1996 मध्ये झालेल्या पाॅवर ऑफ अॅटर्नीचा उल्लेख ईडीकडून केला जात आहे.

फौजदारी कायद्यात पूर्वलक्ष्यी प्रभावाने कारवाई करता येत नाही. तुम्ही वीस वर्षांनी जागे व्हाल आणि 14 दिवसांची पोलिस कोठडी मागाल, हे बरोबर नाही. या प्रकरणात गॅंगस्टर दाऊतविरोधात FIR कोणी पाहिलेला नाही. मलिक यांची दाऊद इब्राहीमशी लिंक असल्याच्या आरोपात तथ्य नाही. महाविकास आघाडीचा नेता राष्ट्रविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.

ज्या सलीम पटेलच्या आधारावर ईडी आरोप करत आहेत. या नावाच्या दोन व्यक्ती आहेत. एक सलीम पटेल याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा जिवंत आहे असा युक्तिवाद देसाईंनी केला. एक सलीम पटेल उर्फ फ्रूट आहे जो छोटा शकिलचा नातेवाईक आहे. ज्या सलीम पटेलकडून प्राॅपर्टी विकत घेतली आहे तो वेगळा आहे.

नवाब मलिकांना अडकवण्यासाठी हे सारे तयार केले आहे. ईडीने रिमांड रिपोर्टमध्ये एका ठिकाणी नवाब मलिक यांनी प्राॅपर्टी हसीना पारकरकडून विकत घेतली असे म्हटलं आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांनी प्राॅपर्टी मुनिरा प्लंबरकडून विकत घेतल्याचं लिहिलं आहे.

ही दोन्ही वाक्ये कुठेही मेळ खात नाहीत. मुनिराची मालमत्ता सलीम पटेलने पाॅवर ऑफ अॅटर्नीद्वारे विकल्याचे म्हटले आहे. मग सलीम पटेलविरुद्ध आधी गुन्हा दाखल झाला आहे का, असा सवाल देसाई यांनी विचारला. उलट मग या ठिकाणी मलीक यांचीच फसवणूक झाली आहे.

ज्याला अधिकार नव्हते त्याने मालमत्ता त्यांना विकली. या ठिकाणी मूळचा गुन्हा कुठे दाखल झाला आहे? तुम्ही (मुनिरा यांनी) सलीम पटेल याला भाडे घेण्याचे अधिकार दिले होते. त्याने ती जमीन विकली. तुम्ही वीस वर्षानंतर जाग्या झाल्या आहात.

तुम्हाला गेली 15 वर्षे भाडे मिळाले नाही. तरी तुम्ही काही केले नाही. 2022 मध्ये तुम्ही गुन्हा कोणाविरोधात दाखल करता तर मलिक यांच्याविरोधात. या केसमध्ये इतर कोणावरही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे हसीन पारकरचा भाऊ इक्बाल कासकरला दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे, अशा विसंगती देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

ADVERTISEMENT

अमित देसाई यांनी रिमांड रिपोर्टमधील भाषेला जोरदार आक्षेप घेतला. ईडीने `टेरर फंडिंग` (दहशतवादाला मदतीसाठीची रक्कम) असा उल्लेख केला होता. अशा भाषेवर न्यायालयाने निर्बंध आणायला हवेत. तुम्ही पुरावे दाखवा आणि खुशाल त्यांना शिक्षा करा. पण केवळ अशी वाक्ये उच्चारू नका.

तुम्ही सकाळी अटक करता आणि संध्याकाळी टेरर फंडिग म्हणता? हा रिमांड रिपोर्ट म्हणजे हिंदी चित्रपटाचे स्क्रिप्ट आहे काय? हा चित्रपट नाही. हे न्यायालय आहे, असे देसाई यांनी आक्रमकपणे सांगितले.

पीएमएलए (PMLA) हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाही, असे अनेक न्यायालयीन निवाड्यांत सांगितले आहे. रिमांड रिपोर्टमध्ये मलिक हे पीएमएलए कायद्यानुसार दोषी असल्याचा उल्लेख होता. `दोषी` या शब्दाला देसाई यांनी आक्षेप घेतला.

न्यायालयांत आरोपीचा गुन्हा सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतात आणि येथे ईडीचे अधिकारी मलिक हे थेट दोषी म्हणून जाहीर करतात. मलिक हे सातत्याने गेली काही वर्षे निवडून येत आहेत. आपण कोणाला निवडून देत आहोत, हे लोकांना माहीत असते. हा देश नियमांमुळे टिकून राहिला आहे. मलिक यांना अटक करताना सर्व नियमांचे उल्लंघन झाले आहे.

ते विद्यमान मंत्री आहेत. त्यांना मागतील ती कागदपत्रे ते देऊ शकतात. त्यांना अटक करून काय उपयोग होणार आहे? दाखल केलेला गुन्हा आणि त्यांचा संबंधही नाही, असा युक्तिवाद देसाई यांनी केला. (स्रोत:सरकारनामा)

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवाब मलिकपोलीस कोठडी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

राजीनामा! महाविकास आघाडी सरकार कोसळलं; उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री व विधानपरिषद आमदारकीचा दिला राजीनामा

June 29, 2022
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

June 29, 2022
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू; 4 ऑगस्टला मतदान होणार

June 29, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

ठरलं तर! एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी मुंबईत येणार, बहुमत चाचणीला सामोरे जाणार; शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

June 29, 2022
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाला चिरडले; चाक पाठीवरून गेल्याने मृत्यू

ताज्या बातम्या

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी ‘वरद नेत्रालय’ मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

July 1, 2022
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

July 1, 2022
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

कार्यकर्त्यांनो! कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बबनराव आवताडे गट व सरकार परिवाराकडून आवाहन; भूमिका स्पष्ट करणार

June 30, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा