टीम मंगळवेढा टाईम्स ।
भरधाव वेगात अवैध मुरूम टिपरमध्ये घेऊन निघालेल्या टिपर चालकाने मोटर सायकल स्वारास समोरून जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 च्या सुमारास पाठखळ-नंदेश्वर रोडवर घडली आहे.
युवराज चंद्रकांत भंडारे ( वय 40 हुन्नूर ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून अवैध मुरूम वाहत असलेल्या टिपरचा चालक व मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत प्रथम दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हजापूर येथील फॉरेस्ट मध्ये अवैध मुरूम उत्खनन सुरू असून तेथून हा टिपर चोरीचा मुरूम भरून मंगळवेढयाकडे येत असताना
नंदेश्वर-पाठखळ रोडवर आला असता पाठखळ येथून नंदेश्वरच्या दिशेने निघालेल्या मोटारसायकलस्वारास टिपरने समोरून जोराची धकड दिली.
यात मोटारसायकलस्वार भंडारे याचा जागीच मृत्यू झाला असून टिपर पलटी होऊन टिपरमध्ये असलेला अवैध मुरूम रस्त्यावर पडलेला आहे.
याबाबत पोलीस हवालदार तुकाराम कोळी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, गेले अनेक दिवस हाजापूर येथील फॉरेस्ट येथून अवैध मुरूम वाहतूक सुरू असून याबाबत कोणीच आजपर्यंत कारवाई केली नाही. संबंधित प्रशासनाने यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज