मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । समाधान फुगारे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “मनसे केसरी 2024” या जंगी कुस्त्यांचे आयोजन मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल येथे आज रोजी करण्यात आले.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन समारंभासाठी मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळवेढा येथील दामाजी चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.10 जेसिबीच्या सहाय्याने फुलांची उधळण यावेळी करण्यात आली.
दरम्यान 10 जेसीबी व 100 हलग्याच्या साहाय्याने अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला.
हजारो कार्यकर्त्याच्या साक्षीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दामाजीपंताच्या साक्षीने अमित ठाकरे यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचे औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी सोलापूर व पंढरपूर विभागातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे कार्यकर्त्याची अशी ही तत्परता…..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी दामाजी चौकामध्ये हजारो कार्यकर्ते ढोल ताशाच्या गजरासह थांबले असता प्रचंड गर्दी व ट्रॅफिक जाम झाले होते.
अशा मध्येच एक रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रॅफिक मध्ये अडकली परंतु मनसेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णवाहिकेला जलद गतीने रस्ता मोकळा करून वाट करून दिली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या सामाजिक तत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज