टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील एका कंँटीनसमोर आठ इसम एकत्र येवून एकमेकांना झोंबाझोंबी करीत मोठमोठयाने आरडाओरड व शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी
शौकत बादशहा सुतार, इमरान शरीफमहंमद सुतार, सकलेन युसूफ सुतार, कय्युम कलाम सुतार (सर्व रा.शिवाजीनगर,मंगळवेढा)
तसेच रहिमतुल्ला कासिम सुतार, अमीर बन्सीलाल सुतार, महंमद साहेबलाल शेख, मिरा इस्माईल शेख (रा.सुतार गल्ली) या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सार्वजनिक ठिकाणी भांडणे केल्यानंतर पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणल्यावरही त्यांनी तिथेही भांडणे केल्याने पोलिसांनी आरोपींना चांगलाच पोलिसी खाक्या दाखविल्याची दिवसभर चर्चा मंगळवेढा शहरात सुरु होती.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.6 रोजी रात्री 10.00 वा.पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कँटीनसमोर वरील सर्व आरोपी पंढरपूर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी
एकमेकांना हाताने मारहाण करीत मोठमोठयाने शिवीगाळ करीत असल्याचे एका अज्ञात इसमाने ठाणे अंमलदार तथा फिर्यादी पोलिस हवालदार श्रीमंत शंकर पवार यांना प्रत्यक्ष येवून सांगितले.
यावेळी महिला पोलिस शिपाई सुवर्णा मोरे,साेनाली सावंत,पोलिस हवालदार गेजगे,मोरे,पोलिस शिपाई सुरज देशमुख,पोलिस शिपाई तांबोळी ही सर्व पोलिसांची टिम सदर ठिकाणी जावून पाहिले असता
वरील आरोपी मोठमोठयाने ओरडून शिवीगाळ करून हाणामारी करीत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी तेथील भांडणे सोडवून वरील आठ जणांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले होते.
दरम्यान, या आरोपीना पोलिस ठाण्याचे भान न राहिल्याने पुन्हा तेथेही हाणामारी केल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून सुतासारखे सरळ केल्याची चर्चा संपूर्ण शहरात वार्यासारखी पसरली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज