टीम मंगळवेढा टाईम्स।
स्वातंत्र्याच्या भारतीय अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत मंगळवेढा शहरामध्ये उद्या मंगळवार, दि.९ ऑगस्ट रोजी तिरंगा पदयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आज सोमवार, दि.८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांची विचारविनिमय बैठक तहसील कार्यालय मंगळवेढा येथे सकाळी आयोजित केली असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले आहे.
हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपली पुण्यभूमी भारतमाता परकीयांच्या जोखडातून मुक्त झाली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.
दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान संपन्न होणारा हा राष्ट सन्मान सोहळा मंगळवेढा शहरामध्येही भव्य दिव्य व्हावा यासाठी शहरातून ३५० फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची या पदयात्रेत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तरी या बैठकीस जास्तीत जास्त नागरिकांनी व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही आ.आवताडे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज