टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरालगत कृष्ण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आयान इब्राहिम अत्तार (वय १२ रा.करकंब ता. पंढरपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. घटनेची खबर मयताचा मावसभाऊ अशपाक शहीन तांबोळी (वय २६ रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) यांनी दिली.
ही घटना ५ एप्रिल रोजी दुपारी कृष्ण तलावात घडली. या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मृत आयान याचे वडील बाजारपेठेतील मशिदीमध्ये मौलाना आहेत. आयान इब्राहिम अत्तार हा मंगळवेढा लगतच्या कृष्ण तलावात पोहण्यासाठी गेला होता.
त्यास पोहता येत नव्हते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तो तलावात बुडाल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यास उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
तपास पोहेकॉ हजरत पठाण यांच्याकडे आहे. उन्हाळ्यात मुले पोहायला जातात. त्यांच्याकडे पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज