mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक:पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक:पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मी पत्नी काजलवर जीवापाड निस्वार्थी प्रेम केले; पण ती स्वार्थी निघाली..तिने मला धोका दिला. तिच्याकडून माझा शेवट नसता झाला. रोज रोज होणारे वाद सहन होत नाही, अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवत येळपणे येथील अमोल चंद्रकांत शिंदे याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी चौघांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे, की अमोल चंद्रकांत शिंदे याने अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आपल्या नातेवाइकांच्या मदतीने सुरत या ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. दीड वर्षांपूर्वी आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्यासोबत त्याचा विवाह झाला होता.

विवाहानंतर अमोल त्याच्या पत्नीसोबत व्यवसायासाठी सुरत येते राहत होता.लग्नाला काही दिवस झाल्यानंतर किरकोळ कारणांवरून काजल अमोलशी भांडण करत होती. ती आपल्या आई, वडील ,भाऊ व आत्या यांच्या सांगण्यावरून अमोलला मानसिक त्रास करत होती. ज्या-ज्या वेळेस भांडण झाले, त्या-त्या वेळी अमोलला त्याच्या सासू सासर्‍यांनी धमकावून आपल्या मुलीला ते बरोबर घेऊन गेले होते.

सासरे दादा मेटे, सासू निर्मला दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड, आते सासू रुक्मिणी संतोष जाधव हे वेळोवेळी फोन करून व कधी प्रत्यक्षात अमोल यास शिवीगाळ व दमदाटी करत असत. येळपणे गावच्या यात्रेनिमित्त अमोल गावाकडे आला होता. 23 फेब्रुवारी रोजी, ‘तू सुरतला राहिलास तरच मी तुझ्याबरोबर संसार करीन; अन्यथा नाही,’ असे म्हणत काजलने आपले वडील दादा दत्तू मेटे यांस बोलावून घेतले व सासरे आल्यावर त्यांनी सर्वांच्या समोर अमोलला शिवीगाळ केली. अमोल त्यांना त्यावेळी म्हणाला, ‘तुम्ही माझ्या सुखी जीवनाचे वाटोळे केले आहे. तुम्हाला तुमचा मुलगा अमोल दादा मेटे याच्या लग्नात दिलेले 2 लाख 70 हजार रुपये दिले नाहीत.’

त्यावेळेस दादा मेटे यांनी अरेरावी करत शिवीगाळ करत ते काजलला दुचाकीवरून घेऊन गेले. जाताना काजलनही, ‘तू मेला तरी तुझ्या अंत्यविधीला सुद्धा येणार नाही.असे म्हणत वडिलांसोबत गेली.’

पत्नीच्या या भाषेचा अमोलला मानसिक धक्का बसला. त्यानंतर काही काळात अमोलने एक एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये पत्नी काजल, सासरे, सासू, मेहुणी, आते सासू यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. मी आईवडिलांची सेवा करू शकत नाही, याची मला खंत वाटते, असा मजकूर लिहून घरातील छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पत्नी काजलसह, सासरा दादा दत्तू मेटे (रा. आढळगाव ता. श्रीगोंदे), सासू निर्मल दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड (रा. थेरगाव ता कर्जत), आते सासू रुक्मिणी संतोष जाधव (रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंद)े यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
रागाच्या भरात मुलानेच केला बापाचा खून

रागाच्या भरात मुलानेच केला बापाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 4, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा