टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी
मंगळवेढा पोलिस ठाण्यात अनिता काळुंगे यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी मंगळवेढा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान रात्री उशीरा आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

काल शनिवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर व बाजारपेठेत शांतता दिसून आली.

अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मंगळवेढा शहरातील विविध भागात कार्यकर्ते, युवक बंद यशस्वी करण्यासाठी सक्रिय होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

या आंदोलनाला मंगळवेढ्यातील नागरिकांनी एकजुटीने पाठिंबा देत शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली. शहरातील पेट्रोल पंप, दवाखाने, बँका, दूध डेअरी, मेडिकल, भाजी विक्रेते वगळता सर्व आस्थापना बंद होत्या, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस च्या फेल्या सुरळी झाल्या मात्र गर्दी अत्यंत कमी होती.

दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार
सर्व समाजबांधवांची बैठक शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रात्री उशिरा मंगळवेढा शहरातील सर्व समाजातील नागरिकांची बैठक झाली, मंगळवेढा शहर व तालुक्यात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे नागरिकांचे मत आहे,

पोलीस प्रशासनाने घटनान घडता खोटी अॅट्रॉसिटी दाखल करून घेऊ नये व घटना खरी असेल तर दाखल करा, अॅट्रॉसिटी दाखल करताना कोणत्याही निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये असे सांगत आमदार समाधान आवताडे म्हणाले, पोलीस स्टेशनमध्ये महिलेची तक्रार घेत असताना टाळाटाळ झाली, उलट महिलेवर खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली,
त्या अधिकाऱ्याविषयी मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांच्यासह विविध समाजातील बांधव उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











