मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
गायी मेल्या… विहिरीचे पाणी आटलं… कर्ज झालं… दुष्काळ पडला… आता शेती कशी करायची… या विवंचनेत असलेल्या एका १८-वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवलं.
ही घटना बीबीदारफळ (ता. उ. सोलापूर) येथे सोमवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रथमेश अनिल खरात (वय १८, रा. बीबीदारफळ, ता. उ. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा प्रथमेश स्वतःच्या शेतात अज्ञात कारणाने लोखंडी अँगलला

ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यास बेशुद्ध अवस्थेत चुलता सुनील खरात यांनी शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले,

मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉ. प्रदीप खरात यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. प्रथमेश याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच खरात कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.

बैलगाडी अंगावर पडून झाला होता वडिलांचा मृत्यू
मागील दोन वर्षांपूर्वी मयत प्रथमेश याच्या वडिलांच्या अंगावर बैलगाडी पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्यावर शेती करण्याची जबाबदारी अंगावर पडली होती. त्यातच मागील पंधरा दिवसांपूर्वी सापाने दंश घेतल्याने दोन जर्सी गायी दगाविल्या होत्या.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तो सतत विवंचनेत होता अशी चर्चा शासकीय रुग्णालयात ऐकावयास मिळाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












