टीम सोलापूर टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा याकरिता जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा आणि मुरघास जिल्ह्याबाहेर किंवा इतर राज्यांत वाहतूक करून विक्री करण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

डिसेंबर २०२६ पर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार, सध्या सोलापूर जिल्ह्यातील उपलब्ध चारा पुढील अंदाजे १२० दिवस म्हणजेच डिसेंबर २०२६ अखेरपर्यंतच पुरेल इतका आहे.

अशा परिस्थितीत हा चारा किंवा मुरघास इतर जिल्ह्यांत अथवा राज्यांत वाहतूक करून विकला गेल्यास स्थानिक पशुधनासाठी तीव्र चारा टंचाई भासण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलत हा वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे.

जून २०२७ अखेरपर्यंत आदेश लागू
हा बंदी आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून जून २०२७ अखेरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा, पोलीस विभाग, कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










