मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
स्वकष्टार्जित घराच्या ताब्यासाठी सासू-सासरे आणि सून यांच्यात सुरू असलेल्या दीर्घ कायदेशीर लढ्यात अखेर सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक दांपत्याच्या बाजूने कौल दिला आहे. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि उच्च न्यायालयाने दिलेले घराचा ताबा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले असून, या प्रकरणी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे बार्शीतील ज्येष्ठ नागरिक दांपत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बार्शी येथील गट नं. १३४०/२/अ पैकी प्लॉट नं. ३० वरील ‘टू-बीएचके’ घराच्या ताब्यावरून लता अनिल शिंदे व अनिल गुरुनाथ शिंदे या ज्येष्ठ नागरिक दांपत्याचा वाद सुरू होता.

सदर मालमत्ता ही दांपत्याची स्वतःच्या कष्टाने कमावलेली (स्वकष्टार्जित) आहे. त्यामुळे या घराचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी ‘पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७’ अंतर्गत प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याकडे दाद मागितली होती. चौकशीअंती प्रांताधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी घराचा ताबा देण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा
प्रांताधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात वैशाली सचिन शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे अपील केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी हे अपील फेटाळून प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरवला.

त्यानंतर, या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती; मात्र २२ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर यावर अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने वैशाली शिंदे यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयांनी दिलेला घराचा ताबा देण्याचा आदेश कायम ठेवला.
या प्रकरणात ज्येष्ठ नागरिक प्रतिवादी दांपत्याच्या वतीने ॲड. विवेक गजशिव, ॲड. शरद टी. भोसले यांनी, तर सर्वोच्च न्यायालयात ॲड. आनंद दिलीप पाटील यांनी प्रभावी कायदेशीर कामकाज पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












