mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2026
in क्राईम, राष्ट्रीय, शैक्षणिक
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

शिक्षिकेच्या असंवेदनशील वृत्तीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाखापट्टनम येथील एका खासगी शाळेतील सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

विद्यार्थ्याने गृहपाठ केला नव्हता, म्हणून शिक्षिकेने त्याला मारझोड केली, यानंतर गूढ परिस्थितीत मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला.

मुलाच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार आणि सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये जे दिसत आहे त्यानुसार, शिक्षिका मुलांचा गृहपाठ तपासत आहे. निधन पावलेल्या मुलाचा अपूर्ण गृहपाठ पाहून ती संतापते.

यावेळी भेदरलेला मुलगा रडत रडत मारू नका, अशी गयावया करत आहे. तरीही शिक्षिका त्याच्या कानशिलात लगावते. यानंतर पुढच्याच क्षणाला सदर मुलगा शिक्षिकेच्या अंगावर कोसळतो.

View this post on Instagram

दरम्यान मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे.

या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडीओ ताब्यात घेतला आहे. या व्हिडीओत शिक्षिका मुलावर ओरडताना दिसत आहे. शिक्षिका संतापल्याचे पाहून मुलगा रडू लागतो.

हात जोरजोरात हलवून तो विनवणी करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर शिक्षिका त्याच्या शर्टाला पकडून मुलाला खेचते. त्याचा गणवेश ठिक करत असताना ती मुलाच्या गालावर चापट मारते. पुढच्या काही सेकंदातच मुलगा शिक्षिकेच्या अंगावर कोसळतो.

मुलगा खाली कोसळल्यानंतर शिक्षिका त्याला उचलण्याचा प्रयत्न करते. परंतु मुलगा कोणताही प्रतिसाद देत नाही. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. मुलाच्या कुटुंबीयांनी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदर मुलाबरोबर नेमके काय घडले? याचा तपास केला जात आहे. मुलाच्या वडिलांनी दावा केला की, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शाळेतून त्यांना फोन केला गेला नाही. त्यांच्या एका नातेवाईकाने या घटनेची माहिती त्यांना दिली. तसेच घटनेच्या दिवशी मुलाची प्रकृती बरी नव्हती, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

मुलाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने पोलिसांनी याबद्दल पुढील माहिती दिलेली नाही.

दरम्यान आंध्र प्रदेशचे मनुष्यबळ विकास मंत्री नरा लोकेश यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे सहा वर्षांच्या मुलाचा जीव गेल्याचे पाहून हृदय पिळवटून निघाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘आम्ही दोषी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करत आहोत. मी सदर मुलाच्या पालकांप्रति माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. खंबीर राहा. तुमच्या कुटुंबाचे हे नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. आमचे सरकार सर्वतोपरी तुमच्या पाठीशी उभे राहील’, असेही नरा लोकेश म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा