टीम मंगळवेढा टाईम्स |
वडिलांना रुग्णालयात जेवणाचा डबा देण्यासाठी तसेच आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी माचणूरहून मंगळवेढ्याकडे दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीच्या दुचाकीला मागून चारचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील सुगरण हॉटेलजवळ घडली.

बाळासो अण्णासो डोके (वय ४८, रा. माचणूर, ता. मंगळवेढा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ विकास डोके यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, विकास डोके यांचे वडील आण्णासो डोके हे आजारी असल्याने मंगळवेढा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी तसेच काही कागदपत्रे घेण्यासाठी बाळासो डोके हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून माचणूरहून मंगळवेढ्याकडे निघाले होते.

दरम्यान, सुगरण हॉटेलजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. धडकेमुळे बाळासो डोके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हात, पाय व पाठीला किरकोळ मार लागला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाऊ विकास डोके घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी बाळासो यांना नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवले होते. बाळासो यांना मंगळवेढ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अविचाराने व भरधाव वेगात चारचाकी चालवून बाळासो डोके यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांत चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











