टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रांत कार्यालय आवारात असलेल्या जुन्या कारागृहाशेजारील मौल्यवान चंदनाच्या झाडावर चोराने चक्क डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मात्र, या गंभीर घटनेबाबत शासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून, बातमीचे वृत्त देईपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि दुर्लक्षीतपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

करवतीने कापले झाड, मंदिराचीही तोडफोड
प्रांत कार्यालय आवारात जुन्या कारागृहालगत चंदनाचे एक भलेमोठे झाड गेल्या अनेक वर्षांपासून उभे होते. या झाडामुळे परिसराला एक वेगळी शोभा आली होती, तसेच या झाडाजवळ एक लहान देवाचे मंदिरही आहे.

सध्या येथील जुन्या कारागृहातील आरोपी नवीन तहसील कार्यालयातील कारागृहात हलवण्यात आल्यामुळे, रात्रीच्या वेळी या शासकीय कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नसते.

याच गोष्टीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री करवतीच्या साहाय्याने ते चंदनाचे झाड बुंध्यापासून अलग केले आणि त्यातील सुगंधी चंदन पोकळीतून काढून पसार झाले. या चोरीच्या नादात झाड मंदिरावर पडल्याने मंदिराचीही तोडफोड झाली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गुरुवारी सकाळी नागरिक कार्यालयात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली.
शुक्रवारी दिवसभरात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा सुजाण नागरिकांना होती.
मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत महसूल प्रशासन असो वा फॉरेस्ट (वन) विभाग—कोणीही तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आले नाही.

शासकीय जागेतील इतकी महागडी मालमत्ता चोरीला जाऊनही अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या उदासीनतेमुळे त्यांच्या कर्तव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेबाबत मंगळवेढ्यात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









