mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 27, 2026
in सोलापूर
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

सोलापूर शहरातील सुशील नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका ३३ वर्षीय महिलेने तिच्या १४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आयुष्य संपवलं आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास विजापूर रोड परिसरात ही भयंकर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरासह सुशील नगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्षा आधटराव (वय ३३ वर्षे) आणि स्वरा आधटराव (वय १४ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावं आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे विजापूर रोडजवळील रेल्वे रुळावर ही घटना घडली.

दोघांनीही अचानक धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आई आणि मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

रात्री नवऱ्यासोबत वाद झाला, रागात घर सोडलं

एकाच वेळी आई आणि मुलीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा वर्षा यांचं आपल्या पतीसोबत वाद झाला होता.

या वादानंतर त्या रागाच्या भरात आपल्या १४ वर्षीय मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. यानंतर वर्षा यांचा पती पांडूरंग यांनी दोघींचा सर्वत्र शोध घेतला. मात्र दोघी कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठत पत्नी आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांना सुशील नगर परिसरात रेल्वे रुळावर मायलेकींचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी पांडुरंग यांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी बोलवून घेतलं. ते घटनास्थळी दाखल झाले असता ते मृतदेह पत्नी वर्षा आणि मुलगी स्वरा यांचेच असल्याचं निष्पन्न झालं.

पांडुरंग हा वर्षा यांच्या नात्यातील होता. तो आत्याचा मुलगा होता. नात्यात लग्न करूनही अशाप्रकारे किरकोळ वादातून मायलेकींनी जीवन संपवल्याने सुशीलनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा