mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 24, 2026
in मंगळवेढा
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

टीम ​मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी)

कॉलेज परिसरामध्ये आणि बसस्थानकात तरुणींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना मंगळवेढा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. श्री संत दामाजी महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल आणि बसस्थानक परिसरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या १३ ‘रोड रोमिओं’वर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले,

तर ८ दुचाकीस्वारांना चांगलाच आर्थिक दंड ठोठावण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

​तक्रार मिळताच पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

​कॉलेज सुटल्यानंतर तरुणींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंबाबत काही सुज्ञ नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.

याची गंभीर दखल घेत डी.वाय.एस.पी. डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने तात्काळ कारवाईची चक्रे फिरवली.

​निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांच्या पथकाने कॉलेज परिसरात सापळा रचला.

विनाकारण चकरा मारणाऱ्या आणि संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणांना चाणाक्षपणे ओळखून ताब्यात घेतले.

​ मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई

​ओळखपत्राची मागणी: निर्भया पथकाने कॉलेज परिसरात फिरणाऱ्या तरुणांकडे ओळखपत्राची (ID Card) मागणी केली असता, ते दाखवण्यात अपयशी ठरले.

​कारवाईचा बडगा: ताब्यात घेतलेल्या १३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली.
​वाहतूक नियमांचे उल्लंघन: कॉलेज परिसरात गाड्यांच्या विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या ८ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

​”अन्याय सहन करू नका!” — डॉ. आरती कणिरे यांचे आवाहन

​कारवाईनंतर निर्भया पथक प्रमुख डॉ. आरती कणिरे यांनी महाविद्यालय प्रशासनाशी आणि विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. त्यांनी खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या:

“कोणीही छेडछाड करत असल्यास किंवा त्रास देत असल्यास शांत बसू नका. कॉलेजमधील तक्रार पेटीत तुमची तक्रार टाका किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा. मुलींनी कोणताही अन्याय सहन करू नये.”

​कॉलेज प्रशासनासाठी सूचना:

​सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश आणि ओळखपत्र (ID Card) परिधान करणे बंधनकारक करावे, जेणेकरून बाहेरील मुले लगेच ओळखता येतील.
​मुला-मुलींसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. ​आवारात संशयित किंवा मोकाट मुले आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

नागरिकांनी आणि पालकांनी मंगळवेढा पोलीस आणि निर्भया पथकाच्या या धडक कामगिरीचे जोरदार स्वागत केले असून, अशा कारवाया नियमित सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 29, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
Next Post
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस'च्या विद्यार्थ्यांचे 'नॅशनल समर कॉम्पिटिशन'मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

ताज्या बातम्या

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..