टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील मुस्लिम जमीयत कब्रस्तानसमोरील मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे आणि आडवी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना मंगळवेढा पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर थेट भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांचे पुरते धाबे दणाणले आहेत.

तक्रारीची तात्काळ दखल, डीवायएसपींच्या सूचना
मुस्लिम जमीयत कब्रस्तानसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही वाहन चालक आपली वाहने आडवी-तिडवी लावून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे केल्या होत्या.

या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत मंगळवेढा उपविभागाचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाण्याला संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस पथकाची जागेवरच धडक कारवाई
डीवायएसपींच्या सूचनेनुसार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे व प्रवीण जाधव यांच्या पथकाने

बोराळे नाका परिसरातील मुस्लिम जमीयत कब्रस्तान समोर धडक मोहीम राबवली. यावेळी रस्त्यावर आडवी वाहने लावून अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना पकडून त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले.

…तर गाठ पोलिसांशी आहे; पोलीस प्रशासनाचा कडक इशारा!
सदरची दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई यापुढेही अशीच नियमितपणे चालू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनधारकाने आपली वाहने सार्वजनिक रस्त्यावर इतर नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने पार्क करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.— दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस निरीक्षक मंगळवेढा पोलीस स्टेशन.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














