मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
शेतकऱ्यांची दिशाभूल करत रासायनिक खताच्या नावाखाली चक्क मिठाची विक्री करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघडकीस आला आहे.

पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील मे. प्रहार उद्योग समूह कृषी केंद्र चालक सतीश भोसले आणि अवधूत ॲग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. (सदर बझार, सातारा) चे संचालक रविराज कणसे यांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाटखळ येथील मे. प्रहार उद्योग समूह कृषी केंद्र चालक सतीश भोसले आणि अवधूत अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक रविराज कणसे यांनी अवैधरित्या रासायनिक खतांची विक्री व उत्पादन करून शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभाग मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी तथा मंगळवेढा येथील कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पाटखळ येथील मे. प्रहार उद्योग समूह कृषी केंद्राच्या सतीश मनोहर भोसले याच्या दुकानातून बोगस रासायनिक खत विक्री होत असल्याची तक्रार कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे एका शेतकऱ्याने केली होती.

त्यानुसार दि.८ जून रोजी कृषी संचालक (गु.नि.) कृषी आयुक्तालय पुणे यांचे दूरध्वनी संदेशाद्वारे सुमारे ७ वाजता कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, कृषी अधिकारी (गुनि) हरिदास बोंगे, आर.पी. कांबळे हे तपासणीसाठी दाखल होते.

त्यांनी मे. प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्राच्या दुकानाची व गोडाऊनची तब्बल सहा तास पाहणी व तपासणी केली असता गोडाऊनमध्ये अवधूत अॅग्रो इंडस्त्रीज इंडिया प्रा.लि. सदर बझार, सातारा या कंपनीचे नाव व पत्ता असलेली रासायनिक खते आढळून आली.

यावेळी खत विक्री परवानामध्ये दुकानात विक्री करत असलेच्या सर्व उत्पादनाच्या स्त्रोतांचा समावेश नसने, तसेच संबंधित ठिकाणावरील साठवणूक केंद्राचा परवान्यामध्ये समावेश आढळून आला नाही,

साठा पुस्तक अद्यावत नसणे, खताचा साठा फलक व दर सूची ग्राहकास ठळक दिसेल अश्या ठिकाणी प्रदर्शित न करणे, खताची विक्री करताना शेतकऱ्यांना एम- फॉर्म मध्ये बिले न देणे, रासायनिक खताची विक्री पॉस मशिनद्वारे न देणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या.

यातील अमोनियम सल्फेट व विद्राव्य खताचे नमुने घेवून तपसणी साठी खत चाचणी प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आली असून या सदर दुकानदारास विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला. व सर्व साठा सीलबंद करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












