मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
जनगणना कार्यासाठी कर्तव्यावर निघालेल्या शिक्षकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवार ६ जून रोजी त्यांचे निधन झाले. कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरविल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप गणोरकर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, करजगाव येथे कार्यरत होते.

तेथेच त्यांची जणगणना प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तालुक्यातील तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस असल्याने या प्रखर तापमानात जनगणना करणे धोकादायक असताना गणोरकर यांनी आधल्या दिवशी प्रगणक म्हणून कर्तव्य बजावले.

सकाळी सात वाजता ते कर्तव्यावर निघाले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते परतीला गावाकडे निघाले.
वरूडातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. शिक्षक संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

गणोरकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी, तसेच आवश्यक ती मदत व सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आमदार उमेश यावलकर व नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांनी गणोरकर यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












