टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा बसस्थानकावरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आता आपला मोर्चा वृद्ध महिलांकडे वळवला आहे.
शनिवारी दुपारी पुणे-विजापूर बसमध्ये चढत असताना एका अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ शिताफीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?
मंगळवेढा येथील जय भवानी नगर (पंढरपूर रोड) येथील रहिवासी पांडुरंग सखाराम साळुंखे (वय ६९) हे आपल्या आईसह ९ मे रोजी विजापूरला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते.

दुपारी ३ च्या सुमारास पुणे-विजापूर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा चोरट्याने घेतला. यावेळी त्यांच्या आईच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरट्याने लंपास केली.

विजापूरला गेल्यावर चोरी उघड
बस प्रवासात असताना दागिना चोरीला गेल्याचे विजापूर शहराजवळ पोहोचल्यावर साळुंखे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शोधाशोध केली, मात्र गर्दीत गायब झालेल्या संशयित चोरट्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
अखेर विजापूर येथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी मंगळवेढ्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवाशांना आवाहन
बसस्थानकावर किंवा प्रवासात दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













