mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2026
in क्राईम, मंगळवेढा
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर सावधान! मंगळवेढा तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पळून जाण्याच्या बेतात असलेल्या नववधूला आणि महिला एजंटला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे लेंडवे चिंचाळे येथे पकडण्यात आले आहे.

​नेमकी घटना काय?

​लेंडवे चिंचाळे येथील विकास आवताडे हे लग्नासाठी मुलगी शोधत असताना त्यांची ओळख सुरेखा सूर्यवंशी नावाच्या एका महिला एजंटशी झाली.

संबंधित मुलगी ही ‘मराठा’ समाजातील असल्याचे सांगून आणि ती परप्रांतीय असल्याची माहिती लपवून हा विवाह ठरवण्यात आला. या बदल्यात एजंटने २ लाख ५० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले.

​असा झाला बनाव…

​१६ एप्रिल: उदगीर येथे मुलगी दाखवण्यात आली.
​विवाह सोहळा: लातूर-उदगीर मार्गावरील एका मंदिरात पद्धतीने लग्न पार पडले, त्यानंतर गावात पारंपरिक विधीही झाले. ​२३ एप्रिल: संशयास्पद हालचाली करत नववधूने चारचाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

​अन् ‘तिचा‘ पर्दाफाश झाला

​संबंधित महिला पळून जात असल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिचा पाठलाग केला आणि मंगळवेढा शहराजवळ तिला गाठले. पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली:

संबंधित महिला ही गुजरात राज्यातील आहे. तिचे यापूर्वीच लग्न झाले असून तिला अपत्यही आहे. ती मराठा समाजातील नसून केवळ पैसे उकळण्यासाठी हा खोटा बनाव रचला होता.

​पोलिस कारवाई आणि आवाहन

​विकास आवताडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित महिला आणि एजंटवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, याच तालुक्यातील दक्षिण भागात अशाच प्रकारे एका महिलेने दोन तरुणांची फसवणूक केल्याची चर्चा आहे, मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार केलेली नाही.

​लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेताना मध्यस्थांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मुलीची आणि तिच्या कुटुंबाची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करणे टाळा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लुटेरी दुलहन

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा