mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 28, 2026
in राज्य
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

शेतीमालाच्या वाहतुकीसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या वादातून रस्ते अडवण्याचे प्रकार घडताहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. शेतरस्ते अडवणाऱ्यांची आता खैर होणार नाही. थेट पाच वर्षे सरकारी योजनांसाठी संबंधित लोक अपात्र होणार आहेत.

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे.

या हेतूने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी शासन निर्णयामध्ये सुधारणा करून नवा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

त्यानुसार शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहेत.

याचाच अर्थ संबंधित थेट पाच वर्षे सरकारी योजनांसाठी अपात्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला.

शासन निर्णयात काय म्हटले आहे?

गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेले आणि शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण ७ दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी आणि अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येईल.

प्रस्तुत योजना राबविण्याकरीता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरीता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र/बक्षीसपत्र/ हक्कसोड करणे अनिवार्य राहील.

सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर घेण्यात येईल.

(दि.१८.०२.२०२६ रोजीचे शासन शुद्धीपत्रक या प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासनास दिलेली जमीन परत मागण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही.

पाणंद रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर!

राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना लवकरच स्वतंत्र ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व अधिकृत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांची नोंद सातबारा (७/१२) उताऱ्यावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी बातमी

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार

May 16, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा

May 16, 2026

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

महसूल विभागातील सुनावण्यांबाबत मोठा निर्णय, वेळेत निकालासाठी नवीन कार्यपध्दती लागू; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढाकार

May 16, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा

May 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा