mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 3, 2026
in सोलापूर
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय.

अशातच या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

15 जणांवर गुन्हा दाखल

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शालन शिंदे यांनी मयत बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा जीव घेतला, असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे आता पोलीस देखील तातडीने प्रकरणाता छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अर्ज मागे घेण्यावरून सुरू झाला वाद

या घटनेमागे राजकीय स्पर्धेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. भाजप उमेदवार शालन शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातीलच दुसऱ्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांच्यासोबत त्यांचा तीव्र वाद झाला होता.

हा वाद अर्ज मागे घेण्यावरून सुरू झाला होता. या वादानंतर रेखा सरवदे यांनी आपला अर्ज तर मागे घेतला, मात्र हा वाद तिथेच थांबला नाही. त्यानंतर बाळासाहेब सरवदे यांची हत्याचं झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

भाऊ पांडुरंग सरवदे यांची तक्रार

या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून बीएनएस कलम 103, 109, 189 (1), (2) आणि शस्त्र अधिनियमासह एकूण 13 कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

सोलापूरात 102 जागांसाठी आता 737 उमेदवार

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांसाठी आता 737 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 1230 वैध अर्जांपैकी 493 उमेदवारांनी माघार घेतली.

यामुळे आता 26 प्रभागांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, आज या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती अत्यंत सावधपणे राबवली असून पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यात त्यांना मोठे यश आले आहे.

पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर यांच्यात समन्वयाचे प्रयत्न यशस्वी झाले. यामध्ये प्रामुख्याने जगदीश पाटील, पांडुरंग दिड्डी, प्रभाकर जामगुंडे, परमेश्वर माळगे, श्रीकांत घाडगे आणि इंदिरा कुडक्याल या बंडखोर नेत्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना यश आले असून त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.(स्रोत:ibn मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर महापालिका

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! थेट तहसीलदारांनाच धमकावले; ‘महा-ई-सेवा’ केंद्र चालकाची मुजोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 24, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल; रक्ताचं पाणी करून शिकवले, त्याच बापावर आली भीक मागण्याची वेळ; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

May 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहीम’ सुरू; ​कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद; अधिकारी थेट तुमच्या गावात मुक्कामाला येणार

May 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

May 21, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

May 18, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी आ.समाधान आवताडेंची मोठी कामगिरी; परिवहन कार्यालयाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

May 16, 2026
Next Post

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

ताज्या बातम्या

नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा