mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रहित आणि समाजाला दिशा देणारे उपक्रम सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले अत्यंत कौतुकास्पद; जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि स्नेहसंवाद मेळावा दिमाखात संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2025
in मनोरंजन, सोलापूर
राष्ट्रहित आणि समाजाला दिशा देणारे उपक्रम सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले अत्यंत कौतुकास्पद; जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि स्नेहसंवाद मेळावा दिमाखात संपन्न

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सूर्योदय उद्योग समूह संचलित सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले सर्वच उपक्रम अत्यंत कौतुकास्पद, राष्ट्रहिताचे आणि समाजाला दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गार पुणे येथील सुप्रसिद्ध विनोदी वक्ते अशोक देशमुख यांनी काढले.

अनिलभाऊ इंगवले आणि त्यांच्या टीमने इथे मोठ्या संख्येने ज्येष्ठ व्यक्तींना एकत्र बोलावून माझ्यासारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीला त्यांच्यात मिसळण्याची संधी दिली असे सांगत छोट्या छोट्या गोष्टीतून विनोदाची निर्मिती करत त्याचबरोबर आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देत उपस्थितांना सुमारे तासभर त्यांनी मंत्रमुग्ध केले.

यावेळी सर्व उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली. उपस्थित सर्वांनी यावेळी नृत्यांमध्ये देखील सहभाग घेत कार्यक्रमाला प्रचंड दाद दिली.  सुरुवातीला सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यामध्ये एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन यांची वाटचाल सांगत सूर्योदयने आजपर्यंत केलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य असलेल्या तपस्वींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे भाग्य आम्हाला लाभत असून समाजातील प्रत्येक घटकांसाठी मनापासून काम करण्याची सूर्योदयची परंपरा आहे.

आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या आशीर्वादावरच सूर्योदय उद्योग समूह आपली यशस्वी वाटचाल करत असल्याचेही  त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.

यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व ज्येष्ठ निरूपणकार सुभाष लऊळकर सर, मेडशिंगीभूषण डॉ मच्छिंद्र सोनलकर, आपुलकी प्रतिष्ठानचे प्रा राजेंद्र यादव इत्यादी मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सूर्योदयने फक्त आपला उद्योग आणि व्यवसाय एवढीच संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जपली असून आपला हा सर्वसमावेशक आणि व्यापक विचारच तुम्हाला उत्तरोत्तर आणखी यशाकडे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत यांनीही यावेळी बोलताना बचत व योग्य गुंतवणुकीचे महत्त्व सांगत सूर्योदय ग्रुप बद्दल विशेषतः सूर्योदय फर्निचर मॉल, वस्त्रनिकेतन आणि बझार बद्दल अधिक माहिती सांगितली. यावेळी मंचावर सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन  डॉ बंडोपंत लवटे आणि एल के पी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या या स्नेहसंवाद मेळाव्यात सांगोला शहर आणि तालुक्यातील शिक्षण, शेती, संरक्षण, उद्योग व व्यापार, पत्रकारिता, सामाजिक कार्य, विविध संघटना अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सूर्योदय फाउंडेशनने दिलेल्या या पुरस्कारामुळे आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अधिकचे प्रोत्साहन मिळाले असून आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याच्या भावना यावेळी सर्वच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी बोलून दाखवल्या.

पावसाचे वातावरण असतानाही महिलांसह सर्वांची मोठी उपस्थिती, सूर्योदयचे निरपेक्ष कार्य, कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड यामुळे आजचा कार्यक्रम खूपच दर्जेदार झाला असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सूर्योदय

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
Next Post

मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात; 'या गावातील धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत

​’डायल ११२’ वर एक कॉल अन् खेळ खलास! मंगळवेढ्यात चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ७ आरोपींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! आधी पत्नी अन् २ पोटच्या मुलांना आयस्क्रीममधून विष दिलं, नंतर मुख्याध्यापकाची आत्महत्या; पोलिसांना सापडली २२ पानांची सुसाईड नोट

June 13, 2026
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा