mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ह्रदयद्रावक! तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 17, 2025
in राज्य
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. मात्र, तरुण मुलाच्या आत्महत्येच्या धक्याने वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यातच आईलाही हृदयविकाराचा झटका आल्याचा ह्रदयद्रावक प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

अवघ्या 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला, आर्थिक संकटाला कंटाळून मृत्युला कवटाळले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे.

मात्र, ग्रामस्थ करुन करुन काय करणार आहेत, आता शासनानेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊ करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

वडील भीमराव बेदरे यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती, या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज. त्यातच, बेदरे यांना आजाराने ग्रासल्याने ते अंथरुणाला खिळले होते. कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या मुलावर म्हणजेच राहुलवर आली. शेती आणि मिळेल ती मजुरी करुन राहुल आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत होता.

 

पण, शेतीतील नापिकी आणि वडिलांचे आजारपणामुळे नैराश्याने त्यालाही ग्रासले. याच नैराश्यातून त्याने 10 जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या तरुण मुलाच्या मृत्युच्या धक्याने वडिलांचाही दोन दिवसांत म्हणजेच 12 जून रोजी मृत्यू झाला.

कुटुंबावर कोसलळेलं हे संकट आईच्याही काळजाचा ठोका चुकवणारं होतं. मुलगा आणि पतीच्या मृत्युच्या घटनेनंतर आई शोभाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण घरात दु:खाचा डोंगर असताना त्याही रुग्णालयात मृ्त्युशी झुंज देत होत्या.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढावा

बेदरे कुटुंबीय राहात असलेल्या सावरगाव परिसरातील सर्व शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे इथला शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. त्यातूनच बेदरे कुटुंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली.

सरकारने बेदरे कुटुंबाला मदत करावी, तसेच या परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जवळ असलेल्या धोंड प्रकल्पातून पाण्याची सोय करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.

कोरडवाहू शेतकऱ्याची परिस्थिती अधोरेखित करणारी ही घटना म्हणावी लागेल. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना या परिस्थितून बाहेर काढण्यासाठी केवळ घोषणा करण्याऐवजी ठोस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी कर्जबाजारी

संबंधित बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

सावधान! वीज वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार; 'या' भागांना इशारा, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज...

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा