mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्यात ‘या’ 16 ठिकाणी आज युद्ध सराव; हल्ल्यापासून बचावासाठी केंद्र सरकारचे निर्देश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2025
in राज्य, राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पाकिस्तानसोबत लढण्यासाठी आता आपण सगळे सज्ज झालोय. या युद्धसज्जतेसाठी राज्यातही आज 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या सगळ्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे.

युद्धजन्य परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली जाऊ शकते, याची चाचणी मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली जाणार आहे.

पाकिस्तानसोबत लढण्यासाठी महाराष्ट्र तयार झाला आहे. महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत.

महाराष्ट्रातल्या मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, मनमाड, सिन्नर, रायगड, रोहा, धाटाव, नागोठणे थळ, वायशेत, रोहा, संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे, भुसावळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.

केंद्राच्या मॉकड्रिलआधी महाराष्ट्रानं मात्र त्या आधीच तयारी केली असून दादरच्या डिसिल्व्हा हायस्कूलमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं आहे. यावेळी शत्रूंच्या विमानांची वर्दी देण्यासाठी सायरन वाजवण्यात आला.

महाराष्ट्रातली अनेक ठिकाणं शत्रूच्या यादीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळंच तिथल्या लोकांचा प्रशिक्षण देण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात येते आहे. महाराष्ट्रात जवळपास 10 हजार नागरी संरक्षण स्वयंसेवक आहेत. या सगळ्या स्वयंसेवकांची फौज ऑनग्राऊंड असणार आहे.

दुसरीकडे ठिकठिकाणच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना मॉकड्रिलसाठी सज्ज राहण्याच्या सूचना मंत्रालय़ातून देण्यात आल्या आहेत. शिवाय आवश्यक ती यंत्रणा आणि सामुग्रीही पुरवण्यात आली आहे. मॉकड्रिलसाठी महाराष्ट्रातील 16 ठिकाणं निवडण्यात आली आहेत.

ही ठिकाणं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहेत. शिवाय ती पश्चिम सीमेजवळ असल्यानं या सोळा ठिकाणी मॉकड्रिल होणार असल्याचं संरक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.

नाशिकमध्येही नागरी आणि लष्करीदृष्ट्या अतिशय संवेदनशील ठिकाणं आहेत. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 9 ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहेत. जळगावमधील भुसावळ रेल्वे जंक्शन आणि तेल डेपो आहे. त्यामुळं तिथंही मॉकड्रिल होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

जेव्हा जेव्हा पाकिस्ताननं भारताची कुरापत केलीय तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. आताही पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच्या कोणत्याही मोहिमेसाठी आता सज्ज झाला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देशात युद्ध सुरू

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
Next Post
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यात 'आदिशक्ती अभियान', जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा