मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आज 15 डिसेंबरचा दिवस. आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते. तर, काही राशींना संकटाच सामना करावा लागू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही?
आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही कोणाच्याही वादात पडू नका. अन्यथा तुमच्या वागणुकीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायात छोटे-मोठे अडथळे येऊ शकतात. हे अडथळे वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांच्या मदतीने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आरोग्याबाबत सतर्क राहा.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, तुम्हाला अनेक ऑर्डर्स मिळतील. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे काम मनापासून करण्याचा प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला योग्य तो लाभ मिळेल.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. दिवसाची सुरुवातच तुमची प्रसन्न होईल. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा.
(टीप : वरील सर्व बाबी मंगळवेढा टाईम्स न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मंगळवेढा टाईम्स न्युज कोणताही दावा करत नाही.)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज