टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘प्रकाश आवताडे या व्यक्तीने माझ्या आयुष्याचे वाटोळे केले असून, बायको व सासू-सासऱ्यांना फसवले आहे. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत असून माझ्या मरणास प्रकाश आवताडे जबाबदार आहेत,’ असा धक्कादायक व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवून एका ४२ वर्षीय व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दत्तात्रय नामदेव पाटोळे (वय ४२, रा. मेडशिंगी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू दयानंद नामदेव पाटोळे यांनी पोलिसांत खबर दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पाटोळे हे ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास दातपुर (ता. मोहोळ) येथून मेडशिंगी येथे येण्यासाठी निघाले होते. दुपारी १२:४५ च्या सुमारास त्यांच्या पत्नीने कुटुंबियांना फोन करून ते पोहोचले का याबाबत विचारणा केली असता, ते पोहोचले नसल्याचे समोर आले.

नातेवाईकांनी दत्तात्रय यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.
दरम्यान, चुलत भाऊ दादासो पाटोळे यांनी दत्तात्रय यांच्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेला व्हिडीओ स्टेटसबद्दल माहिती दिली. त्या व्हिडीओमध्ये दत्तात्रय यांनी “प्रकाश आवताडे या व्यक्तीने माझ्या आयुष्याचे वाटोळे केले आहे.

माझे बायको, सासू, सासरे यांना फसविले आहे. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मरणास प्रकाश आवताडे जबाबदार आहेत,” असा मजकूर रेकॉर्ड करून ठेवला होता.

त्यानंतर नातेवाईकांनी सांगोला, मंगळवेढा आणि खोमनाळ भागात त्यांचा शोध सुरू केला. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास मंगळवेढा शहरातील खोमनाळ रोडवरील प्रवीण वाकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पाटोळे यांनी स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मंगळवेढा पोलीस पुढील तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













