टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा उजनी कॉलनीत एक कुटुंबीय दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि महाप्रसादास गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून धूम ठोकली. भरदिवसा ही घटना घडली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
शहर- तालुक्यात घराला कुलूप दिसले की फोडलं घर, असा फंडा चोरट्यांकडून सुरू असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी नितीन विठ्ठल कुंभार (वय ३२) उजनी पाटबंधारे विभागात चालक असून ते कुटुंबासह उजनी कॉलनी येथे राहावयास आहेत. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घराला कुलूप लाऊन
फिर्यादी कुटुंबासह उजनी कॉलनीत दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून फिर्यादीचे कुटुंब घरी परतले, त्यावेळी त्यांना घराचे लावलेले कुलूप दिसून आले नाही व घराचा कोयंडा वाकलेला दिसला.
यावेळी फिर्यादीने घरात जाऊन तपासणी केली असता, कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. यात २ लाख ७५ हजारांचे पावणेतीन तोळ्याच्या दोन पाटल्या, ५० हजारांची १ तोळ्याच्या दोन अंगठ्या,
२० हजारांची ४ ग्रॅमची अंगठी, १ लाख ४० हजारांचे सोन्याचे गंठण, ७५ हजारांचे सोन्याचे चैन, ४५ हजारांचे कर्णफुले व झुबे, ४७ हजारांची रोकड असा एकूण ६ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला असल्याचे कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज