mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! वेळ पडली तर मराठे ‘या’ पक्षाचा एन्काउंटर करणार; मनोज जरांगे पाटलांचा घणाघात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 18, 2024
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला. “वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

“अजून काही ठरले नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे. उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे.

शेती, आरक्षण, दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले आहेत, आणि आज पुन्हा काही अर्ज आले आहेत”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

“ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. या मनस्थितीमध्ये फडणवीस यांनी जायला भाग पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांची मुडदे फडवणीस यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस, आणि देशात पहिला आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती,

पण त्यांनी विष आमच्या नारड्यात ओतले. फडवणीस यांनी जाताना खुन्नस दिली आणि मला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले. धनगर आरक्षणचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि त्यांनी रद्द केला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.

अनेक नेत्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

दरम्यान, मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षांना मोठा तोटा सोसावा लागला होता.

यानंतर आता विधानसभेत मनोज जरांगे हे स्वत: मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांना धडकी भरली आहे. त्यामुळे अनेक आजी-माजी आमदारांनी आतापर्यंत मनोज जरांगे यांची अंतरवली सराटीत जावून त्यांची भेट घेतली आहे.

विशेष म्हणजे नुकतंच माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अंतरवली सराटीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे ज्यांनी विधानसभा उमेदवारासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी चर्चा करत आहेत. या बैठकीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित झाले होते. या बैठकीसाठी आलेल्या गाड्यांची 10 एकरच्यावर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
Next Post
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन; सर्वांनी उपस्थित राहण्याचे कोमल ढोबळे-साळुंखे यांचे आवाहन

काय वेळ आली! भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून लक्ष्मण ढोबळे यांना डावललं जातंय; सोडचिठ्ठी देत लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा