mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खासदार प्रणिती शिंदेकडून पालकमंत्री यांचा ‘या’  शब्दाच्या हावभावप्रकरणी सोशल मीडियावर टीकेची झोड; भाजपकडून जोरदार टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2024
in राजकारण, सोलापूर
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत ‘चंपा’ असा हावभाव केला. त्यावरून सोशल मीडियावर नूतन खासदारावर टीका होत आहे. या प्रकरणात ‘ताई तुमचं चुकलंच’, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.

त्यामुळे सध्यातरी सोशल मीडियावर खा. शिंदे या टीकेच्या धनी ठरत आहेत, तर ताईंना ट्रोल केलेल्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे खा. शिंदे यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील कार्यक्रमास जाण्यास उशीर झाला.

त्यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांची माफी मागितली. तसेच त्या म्हणाल्या, मी कार्यक्रमास सकाळीच येत होते; मात्र ‘चंपा’चा हवाभाव करत या कारणांमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले.

त्यावेळी तेथील नागरिकांना हसू आवरले नाही; मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबद्दल असे हावभाव करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून इतर भाजपच्या मोठ्या नेत्यांना त्या टार्गेट करत आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यातच त्यांनी ‘चंपा’चा हावभाव केल्यामुळे त्या टीकेच्या धनी होत आहेत. त्यांनी योग्य वेळीच सावध होण्याची गरज आहे; अन्यथा याचा फटका विधानसभेत बसेल.

काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रत्युत्तर

खा. शिंदे यांनी पालकमंत्र्यांबाबत ‘चंपा’ असा हावभाव केल्यामुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देत ताईंना पाठिंबा दिला आहे.

अंधभक्तांना ताईंना बोलण्याचा अधिकार नाही. गांजाची झाडे तुळशीला पावित्र्य शिकवत होते म्हणे, तसे अंधभक्तांचे सुरू आहे, असा टोला भाजप कार्यकर्त्यांना मारला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे.

सोशल मीडियावर खा.शिंदे ट्रोल

‘वारंवार तथ्यहीन वक्तव्य करून पप्पाची परी ही बौद्धिक अपरिपक्व आहे, हे दिसून येत आहे’, ‘सुसंस्कृत कुटुंबाची असंस्कृत कन्या’, ‘कुणाची पोरगी हाय रं’, ‘पापा की परी, राहा घरी’ अशा विविध प्रकारे भाजप कार्यकर्त्यांसह तरुणांकडून ट्रोल करण्यात येत आहे.(स्रोत;पुढारी वृत्तसेवा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

संबंधित बातम्या

वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
Next Post
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! पेपर फोडणं आता पडणार महागात; केंद्र सरकारने मध्यरात्री लागू केला नवा कायदा

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा