mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! पेपर फोडणं आता पडणार महागात; केंद्र सरकारने मध्यरात्री लागू केला नवा कायदा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2024
in राष्ट्रीय, शैक्षणिक
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर भविष्यात पेपरफुटीच्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी, त्या रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारपासून एक कठोर कायदा लागू केला आहे. त्या अंतर्गत परीक्षेत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

तर पेपर लीक करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. संसदेने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता.

परीक्षा आयोजित करणारी संस्था, सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेने कोणताही संघटित गुन्हा केल्यास, त्यांना कमीत कमी 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल, ती 10 वर्षांपर्यंत वाढू शकते.

तसेच 1 कोटींचा दंडही होऊ शकतो. केंद्रीय
लोकसेवा आयोग (UPSC), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अन्यायकारक मार्ग रोखणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.

मालमत्ता जप्त करण्याचीही कायद्यात तरतूद

हा दंड एक कोटी रुपयांपेक्षा कमी नसावा, असे कायद्यात म्हटले आहे. कोणत्याही संस्थेचा संघटित पेपर फुटीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचीही कायद्यात तरतूद आहे आणि परीक्षेचा खर्चही त्या संस्थेकडून वसूल केला जाऊ शकतो.

मात्र, हा कायदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना दंडात्मक तरतुदींपासून संरक्षण देतो. परीक्षेदरम्यान कोणताही उमेदवार चुकीच्या मार्गाचा वापर करताना पकडला गेला, तर त्याच्यावर परीक्षा संचालन संस्थेच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

परीक्षेचा पेपर किंवा उत्तरे लीक करणे, उमेदवारांना अनधिकृत संवादाद्वारे परीक्षेदरम्यान मदत करणे, कॉम्प्युटक नेटवर्क किंवा इतर उपकरणांशी छेडछाड करणे, प्रॉक्सी उमेदवारांना नियुक्त करणे (डमी उमेदवार बसववणे) यासह ‘अयोग्य मार्ग’ कायद्याने प्रतिबंधित आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नीट परीक्षा

संबंधित बातम्या

बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 12, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
मंगळवेढा ‘या’ ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट; आजी-माजी सैनिकांना कर सवलत देण्याचा केला ठराव

Bharat Bandh : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद; कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

July 9, 2025
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

आनंददायक! ‘जिल्हा परिषद शिक्षकाने बनवले क्रांतीकारी शैक्षणिक ॲप्स’; मुलांच्या विकासाला मिळणार चालना; आता विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेची तयारी करता येणार

July 7, 2025
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता ‘या’ पद्धतीने; शिक्षणमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

July 7, 2025
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात संगणक कोर्स करा  आता फक्त 1900 मध्ये; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची खास ऑफर; 10 जुलैपासून नवीन बॅच सुरू; नावनोंदणीसाठी 9503706404 करा संपर्क

July 7, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
Next Post
Government Job! सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

Job update! मंगळवेढ्यात करिअर घडवण्याची मोठी संधी; 'या' मोठ्या कंपनीत अकाउंटंट पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा