mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2024
in क्राईम, सोलापूर
बेकायदा वाळूसाठा केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यासह अन्य एकास बजावली दंडाची नोटीस!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या झालेल्या जाहीर सभेत दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून

धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याप्रकरणी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या विरूध्द अखेर जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या १ मे रोजी कर्णिक नगरजवळ लिंगराज वल्याळ मैदानावर सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली होती.

त्यावेळी देवेंद्र कोठे यांनाही भाषणाची संधी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

यापूर्वी सोलापुरात काँग्रेसचे नेतै राहुल गांधी यांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास देशातील प्रत्येक महिलेला एक लाख रूपये देऊन लखपती बनविण्याचे आश्वासन दिले होते.

तो मुद्दा पकडून देवेंद्र कोठे यांनी, एका हिंदू पत्नीसाठी एक लाख आणि मुस्लिमाच्या चार पत्नींना चार लाख मिळणार. म्हणजेच काँग्रेसचे मुस्लीमप्रेम जागे होणार आहे.

हिंदुंनीही आता चार विवाह करावेत किंवा भाजपला मतदान करावे, असे वक्तव्य केले होते. त्याबद्दल मुश्ताक महिबूब शेख (रा. बेगमपेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पाठपुरावा केला होता. त्यानुसार पोलिसांनी देवेंद्र कोठे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्र कोठे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे संपर्कप्रमुख म्हणून मोठे झालेले आणि शिंदे यांचे स्थानिक राजकारण पाहिलेले दिवंगत विष्णुपंत कोठे यांचे नातू आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे आहेत.

सात वर्षांपूर्वी महेश कोठे हे काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी देवेंद्र कोठे हेसुध्दा सेनेत दाखल झाले होते. कोठे कुटुबीय सोलापूरच्या स्थानिक राजकारण वलयांकित मानले जाते.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ते वादग्रस्त ठरले आहेत.

दरम्यान,कोठे यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला आहे. त्यावर कारवाई प्रलंबित आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

नागरिकांनो! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत आता थेट मिळणार, मुंबईतील मंत्रालयात जाण्याची गरज नाही; 'या' नंबरवर करा संपर्क

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा