mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचं उट्टं प्रणिती शिंदे काढणार का? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक? आपले प्रश्न सोडवणारा खासदार कोण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 26, 2024
in राजकारण, सोलापूर
ट्विटर वार! भाजपच्या उपऱ्या उमेदवारीवरून  प्राणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना लगावला ‘हा’ टोला; सोलापूरची लेक तुमचंही स्वागत करते..

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा… महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल-रखुमाईचं पंढरपूर, स्वामी समर्थांचं अक्कलकोट ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रं…

ज्वारीचं कोठार, संतांची भूमी अशी ओळख मिरवणारा मंगळवेढा… गिरणगाव म्हणून जगभरात मिरवणारा सोलापूरचा कापड उद्योग…. रेल्वेमार्गानेही सोलापूरला देशातील अनेक महानगरांना जोडले आहे.

मराठी, कन्नड आणि तेलुगू या तीन भाषिकांची लक्षणीय संख्या असलेलं… त्यातही लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्याने कन्नड भाषेचा मोठा प्रभाव असलेलं सोलापूर आता कोणाला सत्ता देणार? हे पाहणं महत्त्वातं ठरणार आहे.

सोलापुरातल्या मतदारांचे प्रश्न

सोलापुरी चादरीच्या उद्योगात मंदी आहे. बिडी कामगारांचेही प्रश्न तसेच आहेत. गिरणगाव म्हणून ओळख असणाऱ्या याच सोलापूरमध्ये अनेक मोठ्या मिल्स बकाल आणि बंद अवस्थेत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुणांचं हैदराबाद, मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय.

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या उजनीचं पाणी अजूनही अनेक तालुक्यांमध्ये पोहोचलेलं नाही. उडाण योजनेत निवड झाली असली तरी तांत्रिक कारणाने सोलापूरची विमानसेवा अजूनही बंदच आहे. सोलापूरची विमानसेवा आणि पाणीप्रश्न केव्हा मिटणार या प्रतीक्षेत सोलापूरकर आहेत. आपले प्रश्न सोडवणारा खासदार सोलापूरकरांना हवाय.

सोलापूर हा तसा काँग्रेसचा गड.. सोलापूरचे खासदार सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदं भुषवली. मात्र 2014 च्या मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेंचाही निभाव लागला नाही. 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्ये तिरंगी लढत झाली. भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5 लाख 24 हजार 985 मते मिळवत बाजी मारली. सुशीलकुमार शिंदेंचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी दारुण पराभव केला होता.

तर यावेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकरांमुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याची चर्चा देखील यावेळी रंगली होती.

सोलापूरमध्ये यंदा मात्र हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. सुशीलकुमार शिंदेंऐवजी आता त्यांची लेक आणि विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

तर भाजपनेही प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंच्या रुपाने तगडा उमेदवार दिलाय. विधानसभेत आक्रमक चेहरा म्हणून राम सातपुतेंची ओळख आहे. उसतोड कामगाराचा मुलगा ते भाजप आमदार असा राम सातपुतेंचा प्रवास आहे.

सोलापुरात आता तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एक टर्म आमदार असणाऱ्या राम सातपुते अशी लढाई रंगणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षांचे आमदार आहेत. त्याचा फायदा सातपुतेंना होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्येही भाजप सोलापूरमध्ये विजयाची नोंद करत हॅटट्रिक साजरी करणार का? की प्रणिती शिंदे विजय साकारत काँग्रेसला मतदारसंघ परत मिळवून देणार? आणि वडिलांच्या पराभवाचं उट्टं काढणार का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.(स्रोत:झी न्युज)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्राणिती शिंदेराम सातपुते

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
Next Post
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

शौक बडी चीज हैं! मंगळवेढ्यात अवैध सावकारी बोकाळली; गरजूंची लूट करून व्याज वसुलीसाठी धमक्या; कर्जदारांना भिकारी करण्याचा उद्योग; पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा