mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तिसऱ्यांदा आरक्षण! ना चर्चा, ना वादविवाद, मराठा आरक्षण एकमताने पास, पण मनोज जरांगे नाराज; आंदोलन अधिक तीव्र करणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 20, 2024
in राज्य
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा आरक्षणासाठी मागसवर्गीय आयोगाचा अहवाल आला. त्यानंतर आरक्षण मंजूर करण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यापूर्वी या अहवालाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळ मंजुरी दिली.

विधिमंडळात हा मसुदा मांडण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले. आरक्षणाचा हा निर्णय धाडसी आहे.

तसेच हे आरक्षण कोर्टात टिकणारे आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करावे, असे आवाहन केले. मग या विधेयकावर कोणतीही चर्चा झाली नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत आरक्षण विधेयक विधानसभेत त्यानंतर विधान परिषदेत मंजूर झाले आणि विशेष अधिवेशानचे सूप वाजले.

तिसऱ्यांदा आरक्षण

मराठा आरक्षणाचा विषय तिसऱ्यांदा सभागृहात आला. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना पहिल्यांदा मराठा आरक्षण विधिमंडळात समंत झाले होते. त्यांनी १३ टक्के आरक्षण दिले होते.

परंतु न्यायालयात ते आरक्षण टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसऱ्यांदा मराठा आरक्षण विधेयक संमत झाले. हे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले.

परंतु सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. फडणवीस यांनीही १३ टक्के आरक्षण दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्यांदा हे आरक्षण मांडले. एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक मांडले आणि ते संमतही झाले. परंतु आता हे कोर्टात टिकणार का? हा प्रश्न आहे.

मनोज जरांगे नाराज

विधिमंडळात मराठा समाजास आरक्षण देण्याचा प्रस्ताव संमत झाला आहे. परंतु मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील नाराज आहेत. त्यांनी मराठा समाजास स्वतंत्र नव्हे तर ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

त्यांनी सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. परंतु ती अद्याप मंजूर झालेली नाही. यामुळे आता मनोज जरांगे आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत.

आता उपोषणादरम्यान अन्न आणि पाणी घेणार नाही. बुधवारी १२ वाजता बैठक घेऊन भूमिका जाहीर करणार आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणात सत्ताधारी, विरोधक एकत्र आले तर मनोज जरांगे वेगळे पडले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

नीट समजून घ्या! मराठा समाजाला आरक्षणातून नेमकं काय मिळणार? तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं; सविस्तर पाहा...

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; उद्या मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 9, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा