mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अध्यादेश दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम; मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण द्या!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 26, 2024
in राज्य
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या.

सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

“छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. सकाळी शासनासोबत चर्चा झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबईमध्ये आलो. सरकारने त्यांची भूमिका आणि आपलीही भूमिका ऐकली. ५४ लाख ओबीसी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा, अशी आपली मागणी होती. ज्या ५४ लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात, त्यांचे वाटप होईल,” असे जरांगे पाटील म्हणालेत.

काय आहेत मागण्या?

तसेच “ओबीसी दाखल्याची एक नोंद जरी सापडली तरी 50-50 जणांना त्याचा लाभ मिळतोय. यामुळे 2 कोटी मराठे लाभार्थी ठरत आहेत. प्रमाणपत्रासाठी आपल्याला अर्ज करणे गरजेचे आहे. गावागावात ज्यांची नोंद मिळाली आहे, त्यांनी अर्ज करण्यास सुरूवात करा,” असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

३७ लाख प्रमाणपत्र वाटप…

“54 लाख प्रमाणपत्रांपैकी 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्याची माहिती मागवली आहे. ३७ लाख म्हणजे कोणाला दिले, त्याची नावासहित माहिती द्या, अशी मागणी केली आहे. अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायची मागणी केली होती, ते मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, असे सरकारने म्हटले आहे, मात्र त्याचे पत्र दिले नाही,” अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे.

सरकारला पुन्हा अल्टिमेटम…

सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार, पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. तसेच आजचा मुक्काम वाशीमध्येच असेल, मात्र उद्या अध्यादेश न आल्यास आझाद मैदानावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्याच्या मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या वेशीवर डेरेदाखल आहेत. त्यांनी जाहीरपणे त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना या मागण्यांविषयी अवगत करण्यात आलेले आहे.

यामध्ये मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्याच्या मागणीकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जरांगे पाटील यांनी या मागणीची पूर्तता करण्यासाठी, शासन आदेश, परिपत्रक काढण्यासाठी आज रात्रीचा वेळ दिला आहे. उद्या दुपारपर्यंत इतर मागण्यांबाबत सरकारची प्रतिक्रिया आल्यानंतर आझाद मैदानात पोहचायचे की नाही, हे ठरणार आहे.

क्युरेटिव्ही पीटीशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सग्या सोयऱ्यांच्या माध्यमातून जर एखादा मराठा राहिला. जुळलं नाही तर ते १०० टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला जगातलं १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं अशी आपली मागणी आहे. या मुद्द्यावर सरकारने सांगितलं की, राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण फक्त मुलींनाच शिक्षण देणार. मुलांना दिले सोडून. खुट्टी ठोकलीच. त्यामुळे मोफत शिक्षणाचा जीआर आज रात्रीपर्यंतच काढा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

नोकरभरतीबाबत ही मागणी

सरकार ज्या नोकर भरती करणार आहे त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत. जर भरती करायची असेल आमच्या जागा राखीव ठेवून करा असे सरकारला त्यांनी बजावलं. जिल्हास्तरावर वसतिगृहाची मागणी केली होती. मेन मागणी आरक्षणाची होती. रात्रभर जीआर वाचून त्यावर चर्चा करणार आहे. याबाबत काही चर्चा करायची असेल तर माझ्याकडे या. माझ्याशी चर्चा करा. मी परस्पर निर्णय घेतल्याचा ठपका ठेवू नका. आपण तीन मुद्द्यांवर आरक्षण लावून धरला आहे. त्यातील अध्यादेशाचा मुद्दा महत्त्वाचा आहे असे त्यांनी सभेला संबोधित करताना सांगितले.

३७ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र

सरकारने ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच एक पत्र आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितले. वंशावळी जोडाल्यानंतर इतरांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. ज्या लोकांना प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा मागितला आहे. नेमकं कुणाला दिलं हे कळेल. डेटा लावून धरणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. मुद्दा प्रमाणपत्राचा आहे, असे ते म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मराठा आंदोलनाचा मोठा विजय! सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; आज दिवाळी साजरी होणार; जरांगे-पाटलांची थोड्याच वेळात विजयी सभा

ताज्या बातम्या

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा