mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा सोलापुरात दाखल; १५ हजार लाभार्थीना देणार चाव्या; ‘रोड शो’ची शक्यता….? कुंभारीत १८०० कोटींच्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 19, 2024
in सोलापूर
आयुष्य समर्पीत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासीयांना आवाहन; स्वातंत्र्यदिनी ‘हा’ संकल्प केला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात येत आहेत. दक्षिण सोलापुरातील कुंभारीमध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या १८०० कोटी रुपयांच्या रे नगर गृहप्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

३० हजार घरांचा हा गृहप्रकल्प असून पहिल्या टप्यात मोदी यांच्या हस्ते १५ हजार लाभार्थीना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

रे नगरातील या प्रकल्पाचा प्रारंभ मोदींच्याच हस्ते करण्यात आला होता, हे विशेष. त्यानंतर ते आज पुन्हा सोलापुरात आले आहेत.

सकाळी ११ वाजता रे नगरातयेथे आगमन झाले आणि तिथूनच १ च्या सुमारास परत जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा हा तिसरा सोलापूर दौरा आहे.

या कार्यक्रमाला सुमारे एक लाख नागरिक येतील असे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. मोदी सकाळी ११ वाजता कुलबुर्गीहून हेलिकॉप्टरने रे नगर येथे उतरले आहेत. त्यानंतर घराची पाहणी करणार आहेत.

अर्धा ते पाऊणतास भाषण करतील. सुरुवातीला मराठी किंवा तेलुगुतून भाषणाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या 3 सोलापूर भेटी

• १६ ऑगस्ट २०१४ : होम मैदान येथे सोलापूर-पुणे महामार्गाचे लोकार्पण

•९ जानेवारी २०१९ : इंदिरा गांधी स्टेडियम येथे समांतर जलवाहिनी कामाचे भूमिपूजन, रे नगर कामाचा शुभारंभ १०० कोटींचा धनादेश देऊन केला, सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ.

• १९ जानेवारी २०२४ : कुंभारी, रे नगरातील १५ हजार घरकुलांच्या चाव्यांचे वाटप

सोलापुरात ‘रोड शो’ नाही

पंतप्रधान सोलापुरात रोड शो करतील आणि सिद्धेश्वर मंदिरात जातील असा अंदाज होता. मात्र रोड शो होणार नाही, असे कळते. ते रे नगरात येतील आणि तिथूनच परत जातील.

पार्किंग व्यवस्था १ किमीवर

कुंभारी परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग असेल. तेथून सुमारे एक किलोमीटरपर्यंत चालत जावे लागेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
Next Post
सजग महिला नागरी बिगरशेती पतसंस्थेमुळे मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडली; शरद पवार यांचे गौरवोद्गार

सजग महिला नागरी बिगरशेती पतसंस्थेमुळे मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडली; शरद पवार यांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा