टीम मंगळवेढा टाईम्स।
सजग महिला नागरी बिगरशेती पतसंस्थेमुळे मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडली असल्याचे गौरवोद्गार देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले आहे.
सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन शरद पवार यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धद्राम म्हेत्रे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, धनश्री परिवार प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, डॉ.अनिकेत देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, कट्टे कृषी केंद्राचे प्रमुख संजय कट्टे-पाटील, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,
विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादीच्या संगीताताई कट्टे-पाटील, काँग्रेस नेते चेतन नरुटे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, दामाजीचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, उद्योजक प्रवीण घाडगे, सर्व सभासद संचालक आदीजन उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, कट्टे-पाटील व माझे संबंध खूप पूर्वीचे आणि स्नेहाचे आहेत.तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी संजय कट्टे यांनी बँकेच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लोकांनी घेतलेले पैसे वेळेत परत केले तर अनेक संसार नव्याने उभे राहतील.
मोठ्या प्रमाणात नागरी सहकार संस्थेचे जाळे बांगलादेशात असून सर्वसामान्य लोकांना याचा पुरेपूर फायदा होत असल्याचे पवार यांनी सांगितले.
संजय कट्टे बोलताना म्हणाले की, सजग महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी बँक सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ, भारत मुढे यांनी केले तर प्रास्तविक संजय कट्टे तर आभार चेअरमन माधुरी कट्टे यांनी मानले.
सोनेतारण कर्ज
सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वांना सोने तारण कर्ज 12.50 टक्के या माफक दरात दिले जाणार आहे.
दामदुप्पट ठेव योजना
नागरिकांना सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये 6 वर्ष 6 महिन्यात या अत्यंत अल्पकाळात दामदुप्पट रक्कम मिळणार आहे.
ठेवींवर आकर्षक व्याजदर
नागरिकांना 46 दिवस ते 179 दिवसाच्या ठेवींवर 9 टक्के इतके व्याजदर दिले जाणार आहे तर 180 दिवस ते 364 दिवसांत 10 टक्के तर 1 वर्षाच्या पुढे 11 टक्के व्याजदर दिले जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे.
कन्यारत्न ठेव योजना
आपल्या मुलींच्या भविष्यासाठी 1 लाख रुपये भरा व 18 वर्षानंतर 7 लाख रुपये नागरिकांना मिळणार आहेत.
मासिक प्राप्ती ठेव योजना
1 लाख रुपये 15 महिन्यांसाठी ठेवा व प्रतिमाहिना 1000 रुपये मिळवा ही आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे.
सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जाणार आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली जाणार आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा, व्यावसायिक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज